mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 11, 2022
in राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स। 

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. मात्र, आता खातेवाटपाचं घोंगडं भिजत पडलं आहे.

अशावेळी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याजिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

कारण खातेवाटपासह पालकमंत्र्यांची नियुक्तीही अद्याप झालेली नाही. अशावेळी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलीय.

तर काही जिल्ह्यात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, अशी माहिती सरकारनं दिली आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार?

देवेंद्र फडणवीस – नागपूर, सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, चंद्रकांत पाटील – पुणे, राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, गिरीश महाजन – नाशिक, दादा भुसे – धुळे, गुलाबराव पाटील – जळगाव, रविंद्र चव्हाण – ठाणे, मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर, दीपक केसरकर – सिंधुदुर्ग, उदय सामंत – रत्नागिरी

डॉ.प्रा.तानाजी सावंत – उस्मानाबाद, अतुल सावे – परभणी, संदीपान भुमरे – औरंगाबाद, सुरेश खाडे – सांगली, विजयकुमार गावित – नंदुरबार, शंभुराज देसाई – सातारा, अब्दुल सत्तार – जालना, संजय राठोड – यवतमाळ

अन्य जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

अन्य जिल्ह्यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण तर अमरावती जिल्ह्यात विभागीय आयुक्त आणि कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला,

सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर आणि नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलीय.

शिंदे सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार केला असला तरी अद्याप खातेवाटप जाहीर झालं नाही. तसंच पालकमंत्र्यांची निवडही झालेली नाही. स्वातंत्र्य दिनी, प्रजासत्ताक दिनी किंवा महाराष्ट्र दिनी जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते.

अशावेळी सरकारनं ध्वजारोहणासाठी जाहीर केलेल्या यादीतील मंत्रीच त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र अद्याप खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून पुन्हा एकदा शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका करण्यात येतेय.

मंत्रिपदावरुन शिंदे गटात मोठी नाराजी असल्याचा दावा विरोधक करत आहेत. अशावेळी भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसांत खातेवाटप होईल असा दावा केलाय. शिंदे गट आणि भाजपमध्ये एकवाक्यता आहे, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय.(स्रोत:TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: यादी समोर

संबंधित बातम्या

दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

June 24, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; असे असणार महत्त्वाचे टप्पे

June 25, 2025
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी; ‘कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी’ आता नव्याने ‘असा’ अर्ज करता येणार

शेतकऱ्यांसाठी खास बातमी; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची ‘ट्रॅक्टर’ बाबत मोठी घोषणा

June 25, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तीस दिवसांत पालकांचे घर सोडा! आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलगा-सून घरात राहू शकत नाहीत; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

June 23, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदय पिळवटणारी घटना! परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत पोटच्या लेकीचा मृत्यू; पप्पा, तुम्ही कलेक्टर झालात का? उलट उत्तर देताच…

June 23, 2025
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

सरकार लाडक्या बहिणींना खुश करणार! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिला मतांवर डोळा; आता लाडक्या बहिणींना मिळणार ९ टक्के व्याजाने ‘इतक्या’ लाखापर्यंत कर्ज

June 22, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

शैतानी वृत्ती! मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या; तोंडांत बोळा कोंबून दिला इलेक्ट्रिक शॉक

June 19, 2025
Next Post
मंगळवेढा कृषी बाजार समितीत ‘या’ शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क; नव्या निर्णयामुळे मिनी विधानसभेचे स्वरूप; गावोगावी प्रचाराला जावे लागणार

मंगळवेढ्यात आज रानभाजी महोत्सव; शिवारातील नैसर्गिक रानभाज्या, रानफळांचे महत्त्व सांगणार

ताज्या बातम्या

दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

June 24, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

‘उजनी’त ३० हजारांचा विसर्ग धरणातील पातळी ‘इतके’ टक्के; भीमेत विसर्ग वाढला, बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती

June 24, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; असे असणार महत्त्वाचे टप्पे

June 25, 2025
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी; ‘कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी’ आता नव्याने ‘असा’ अर्ज करता येणार

शेतकऱ्यांसाठी खास बातमी; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची ‘ट्रॅक्टर’ बाबत मोठी घोषणा

June 25, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा