समाधान फुगारे । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता आलेख आता चिंचेता भर घालणारा ठरत आहे. कारण की, काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज पुन्हा 21 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 403 वर गेली आहे.
मात्र , तरी देखील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी कायम होत आहे.त्यात आता काही ठिकाणी पान स्टॉल , हॉटेलही खुले झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा विळखा कमी होण्याची चिन्हे नाहीत. शुक्रवारी पुन्हा 21 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यात तब्बल 403 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आतापर्यंत 216 जणांना कोरोनावर मात करून ते कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा हा कहर कधी संपणार या प्रश्नांचे उत्तर सध्या तरी कोरोनाकडेच नाही.
आज दि.21 ऑगस्ट रोजी 39 जणांचे स्बॅब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 25 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 25 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सदर नागरिक हे मंगळवेढा शहर 2 आणि मरवडे 1 येथील निकटतम संपर्कातील आहेत.सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्बॅब ( RT – PCR ) चे 18 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले आहे.
सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर 9 , दामाजी नगर 5 , देगांव 1 , आंधळगांव 1 , तांडोर 1 आणि ब्रम्हपुरी 1 येथील निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 403
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 216 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 183 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज 13 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांची संख्या ही चिंताजनक बाब आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणीही घराबाहेर पडू नये. गर्दी न करता आपण कोणत्याही संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही आणि आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Solapur mangalwedha The number of corona patients crossed 400 , increasing to 21 patients today
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज