mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बनवाबनवी! जिवंत मामाचे मृत्युपत्र देऊन भाच्याने जमीन केली हडप; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 28, 2022
in क्राईम, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आता प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यक नसणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मामा जिवंत असताना भाच्याने त्याला मृत दाखवून जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर करण्याचा प्रकार दक्षिण सोलापूर तालुक्यात बरूर येथे घडला आहे.

या प्रकारानंतर संबंधित शेतकरी महसूल प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दाद घेतली जात नाही, अशी निराशाजनक प्रतिक्रिया या शेतकऱ्याने व्यक्त केली.

दक्षिण सोलापूर तालुक्यात हा नवा प्रकार उघडकीस आला आहे. बोळकवठे येथील शेतकरी पैगंबर बंदगी नदाफ यांची बरुर येथे ०.९३ हेक्टर शेतजमीन आहे.

पैगंबर नदाफ यांच्या भाच्याने तलाठ्याकडे दिलेल्या अर्जावरून या शेत जमिनीवरील पैगंबर नदाफ यांचे नाव कमी करण्यात आले आहे. भाच्याचे नाव नोंदवण्यात आले, असे संबंधित तलाठ्याने फेरफार नोंद वहीत नमूद केले आहे.

चार वर्षानंतर प्रकार उघडकीस

पैगंबर नदाफ यांनी बँकेत कर्ज प्रकरण करण्यासाठी आपल्या जमिनीचा उतारा काढला असता त्यांना हा धक्कादायक प्रकार समजला.

चार वर्षांपूर्वी त्यांच्या नावावरची शेत जमीन परस्पर गायब करण्यात आली होती. याचा त्यांना थांगपत्ताही लागला नव्हता. सातबारा उतारा पाहताच पैगंबर नदाफ यांच्या पायाखालची जमीन सरकली.

आधी मृत्युपत्र केले सादर

पैगंबर नदाफ जिवंत असताना त्यांचे मृत्युपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर नदाफ मयत झाल्याचा दाखला मिळवला.

हा मृत्यू दाखला आणि त्याचे मृत्युपत्र तलाठ्याकडे सादर करण्यात आले. त्याच्या आधारे कोणतीही खातरजमा न करता ही शेतजमीन भाच्याच्या नावे केली, असे जिल्हाधिकाऱ्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

माझी जमीन खोटे मृत्युपत्र जोडून परस्पर भाच्याच्या नावावर करण्यात आली. याबाबत मी सातत्याने मागणी करूनही माझे मृत्युपत्र आणि मृत्यू दाखला दिला जात नाही. फेरफार नोंदीची नक्कल मिळत नाही.

मी मंद्रूप आणि दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाकडे ही तक्रारी दिल्या; पण कोणीच दाद घेत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनाही अर्ज दिला आहे- पैगंबर बंदगी नदाफ, शेतकरी बोळकवठा

पैगंबर नदाफ यांनी त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदीची तक्रार माझ्याकडे दिली आहे. ही नोंद करताना संबंधित गावच्या तलाठ्याने कोणती कागदपत्रे घेतली. त्यांनी जोडलेले पुरावे मागितले आहेत.

मंडल अधिकारी परदेशी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे. – राजशेखर लिंबारे , अप्पर तहसीलदार , अतिरिक्त तहसील कार्यालय मंद्रूप

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: हडप

संबंधित बातम्या

सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी; वायचळ यांची बदली

सोलापूर जिल्हा परिषदेचे अनुसूचित जातीसाठी 'हे' १२ गट राखीव होणार? लोकसंख्या उतरत्या क्रमांचा विचार

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा