mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विठ्ठल कारखान्यावरील ‘वारसा हक्क’ सभासदांनी आणला संपुष्ठात; अखेर अभिजित पाटील यांनी उधळला गुलाल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 7, 2022
in सोलापूर
भगिरथ भालके चेअरमन असलेल्या विठ्ठल कारखान्यात कोट्यवधींचा घोटाळा; अभिजीत पाटील यांचा गंभीर आरोप

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विठ्ठल सहकारी साखर कारखाना  निवडणुकीच्या मतमोजणीत विजयाच्या मार्गावर असलेल्या अभिजित पाटील यांनी समर्थकांसह गुलाल उधळला.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/07/VID-20220706-WA0012.mp4

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मतमोजणीत त्यांनी निर्णायक आघाडी घेतली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत अभिजित पाटील गट १ हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होता.

विठ्ठल कारखान्याच्या २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला  सकाळी तहसील कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये सुरुवात झाली.

२० टेबल सहा राउंडमध्ये ही मतमोजणी झाली. प्रथम भाळवणी गटात मतमोजणीत अभिजित पाटील पॅनल ५०० च्या फरकाने काळे – भालके व युवराज पाटील पॅनलपेक्षा आघाडीवर होते.

त्यानंतर करकंब गटातही अभिजित पाटलांचा करिश्मा कायम होता. महत्त्वाच्या मोठ्या गावांमध्ये त्यांनाच मताधिक्य होते.

त्यामुळे दुसऱ्या राउंडअखेर जवळपास १५०० पेक्षा जास्त मतांनी त्यांची आघाडी कायम होती. त्यानंतर तुंगत व मेंढापूर गटात युवराज पाटील पॅनलने जोरदार मुसंडी मारत तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

तरीही अभिजित पाटील पॅनल त्यांच्या पुढेच होता. मात्र, त्यांचे मताधिक्य कमी करण्यात युवराज पाटील पॅनलने यश मिळविले होते.(स्रोत:लोकमत)

संस्था मतदारसंघातून समाधान काळे विजयी..

संस्था मतदारसंघात झालेल्या मतमोजणीत भालके – काळे पॅनलचे उमेदवार समाधान काळे हे ८८ पैकी ६४ मते घेऊन विजयी झाले आहेत तर राजाराम सावंत यांना ५ , तर बाळासाहेब पाटील यांना १९ मते मिळाल.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार सध्याच्या स्थितीत नवखे अभिजित पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा हादरा मनाला जात आहे. अभिजीत पाटील यांची विजय कडे वाटचाल सुरू आहे.

पंढरपूरचे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून या कारखान्याच्या सत्तेकडे पहिले जाते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या मतदानाचा फटका राष्ट्रवादीला बसल्याचे चित्र असून विद्यमान अध्यक्ष भगिरथ भालके यांचे पॅनल पिछाडीवर गेले आहे.

अद्याप संपूर्ण निकाल हाती येणं बाकी असलं तरी अभिजीत पाटील यांच्या पॅनलनं मोठी बाजी मारली असल्याचं आतापर्यंतच्या कलामधून स्पष्ट झालं आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीकडूनच युवराज पाटील यांनीही आपले पॅनल उभे केले होते. मात्र आत्तापर्यंतच्या मतमोजणीत विद्यमान अध्यक्ष भगिरथ भालके यांचे पॅनल तिसऱ्या स्थानावर असून अभिजित पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.

अतिशय तरुण नेता म्हणून अभिजित पाटील यांना पसंती देताना त्यांच्या ताब्यात असणाऱ्या इतर चार साखर कारखान्यामुळे विठ्ठलाच्या मतदारांनी अभिजित पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

पाटील यांनी 20 वर्षांपासून बंद पडलेला सांगोला सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेऊन केवळ 35 दिवसात तो सुरु केला होता. यामुळेच गेल्या 2 वर्षांपासून बंद पडलेल्या विठ्ठल कारखान्यासाठी सभासदांनी अभिजित पाटील यांना पसंती दिल्याचे दिसत आहे.

या पराभवाचा फटका राष्ट्रवादी आणि भगिरथ भालके याना बसणार असला तरी मतमोजणी प्रक्रियेवर दुसरे पॅनल प्रमुख युवराज पाटील यांनी आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली आहे.

साडे सहाशे कोटी देणी असणाऱ्या असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सत्ता मिळविण्यासाठी चढाओढ

पंढरपूरचे वैभव म्हणून ओळख असणाऱ्या आणि सध्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी राजकीय नेत्यात चढाओढ सुरु आहे.

विठ्ठल कारखान्यावर सध्या भगिरथ भालके गटाची सत्ता आहे. मात्र एका गाळपाचे बिल देऊ न शकल्याने तसेच कामगार आणि ऊस तोडणी मजुरांची देणी थकीत असल्याने सत्ताधारी भालके गट बॅकफूटवर आहे.

अशात आर्थिक अडचणींमुळे आणि कोट्यवधींचे कर्जे झाल्याने हा कारखाना गेली 2 वर्षे सुरु झालेला नाही. यामुळे सध्या लागलेल्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत हा कारखाना जिंकण्यासाठी धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कंबर कसली होती. त्यांच्याकडे उस्मानाबाद, नाशिक, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात 4 कारखाने आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजित पाटील

संबंधित बातम्या

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 23, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मोठी बातमी! ​सात वर्षांखालील शिक्षेच्या गुन्ह्यात आधी नोटीस बंधनकारक; कोल्हापूर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

August 19, 2026
कत्तलखान्याकडे जाणारी ३१ जनावरे पकडली; मंगळवेढ्यातील दोघांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फक्त ‘एवढ्या’ टक्के हप्त्यात जनावरांना मिळणार विमा संरक्षण; पशुधन दगावल्यास मिळणार भरपाई; आजच अर्ज करा

August 20, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
Next Post
राष्ट्रवादीला धक्का! दामाजीच्या हितासाठी ‘या’ नेत्यांनी आ.आवताडे गटाला दर्शविला पाठिंबा

राष्ट्रवादीला धक्का! दामाजीच्या हितासाठी 'या' नेत्यांनी आ.आवताडे गटाला दर्शविला पाठिंबा

ताज्या बातम्या

कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 24, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा