टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार सध्या थेट मतदार भेटीगाठींवर भर दिला आहे.
उमेदवार कारखाना सुस्थितीत चालण्यासाठी पुन्हा संधी देण्याचे आवाहन सभासदांना करीत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री आषाढी वारीसाठी पंढरपूर मध्ये येणार आहेत. दामाजी कारखान्याच्या निवडणुकी त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
राज्यातील सत्ता बदलाच्या नाट्यमय घडामोडीमुळे कारखान्याचे अध्यक्ष आमदार समाधान आवताडे हे यांना मुंबई थांबावे लागल्यामुळे त्यांच्या प्रचाराची धुरा सध्या कार्यकर्त्यांनी हातात घेतली
असून त्यांनी सध्या थेट भेटीगाठीवर भर दिला यंदाच्या निवडणुकीत अध्यक्ष आमदार समाधान आवताडे यांनी निवडणूक पूर्वी सभासदांचा कौल जाणून जवळपास दहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली.
उमेदवारांकडून सभासदाशी संवाद साधताना आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली सहा वर्षात कारखाना एकही हंगाम खंडित न करता चालवून दाखवला.
सभासदांना सवलतीच्या दरात सहा वर्षे साखर दिली. विद्यमान संचालक मंडळावर कर्ज नसताना आडकाठी आणण्यासाठी पतसंस्थेची थकबाकी असल्याचे बनावट दाखले जोडून आमदार समाधान आवताडे यांना आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला.
कर्जाचा बोजा कमी करत कारखान्याने अनावश्यक खर्चावर निर्बंध घातल्याचे सांगून त्यांनी आमदार आवताडे नेतृत्वाखालील उमेदवारांना पुन्हा संधी द्यावी असे आवाहन केले.
मंगळवेढा तालुक्यातील सर्वच गटातील उमेदवार पायाला भिंगरी लावून पळत आहेत. त्यांची ही धडपड पाहून सभासदही त्यांना कौल देतील असा विश्वास व्यक्त करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज