mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! ठाकरे सरकारला मोठा धक्‍का, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; मुख्यमंत्री जनतेशी साधणार संवाद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 29, 2022
in राज्य
Breaking! ठाकरे सरकारला मोठा धक्‍का, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; मुख्यमंत्री जनतेशी साधणार संवाद

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाविकास आघाडी सरकारने उद्‍याच म्‍हणजे गुरुवारीच बहुमत चाचणीला सामोर जावे, असा आदेश सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला आहे.

दि.११ जुलै राेजी बंडखाेर आमदारांवरील हाेणार्‍या कारवाईही ही पुढील सुनावणीवेळी ग्राह्य धरली जाईल, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

दरम्यान आज संध्याकाळी 9.30 च्या सुमारास जनतेशी संवाद साधणार आहेत, यामध्ये ते कोणते मुद्दे मांडणार आहेत सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

आता उद्‍या सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीला बहुमत चाचणीला सामाेरे जावे लागणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी गुरुवारी महाराष्‍ट्र सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे, असे आदेश दिले होते.

या विरोधात शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्‍यायमूर्ती सूर्यकांत आणि जे. बी.पारदीवाला यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सर्वोच्‍च न्‍यायालयात तब्‍बल साडेतीन तास युक्‍तीवाद

सुनील प्रभु यांच्‍या याचिकेवर सायंकाळी पाच वाजता सुनावणी सुरु झाली. तब्‍बल साडेतीन तास दोन्‍ही बाजुने युक्‍तीवाद झाला. यानंतर रात्री ९ वाजता निकाल दिला जाईल, असे सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

सुरुवातीला सुनील प्रभु यांच्‍या वतीने ॲड. अभिषेक मनु सिंघवी यांनी तर शिंदे गटाच्‍या वतीने ॲड. नीरज किशन कौल यांनी युक्‍तीवाद केला. तर राज्‍यपालांच्‍या वतीने सॉलिसिटर जनरल यांनी बाजू मांडली.

बंडखोर आमदारांच्‍या अपात्रतेच्‍या निर्णयानंतरच बहुमत चाचणी घ्‍यावी : ॲड. सिंघवी

सुनील प्रभू यांच्‍या वतीने अभिषेक मुन सिंघवी यांनी युक्‍तीवाद केला. राज्‍यपालांच्‍या पत्रावर त्‍यांनी आक्षेप घेतला. राज्‍यपालांचे पत्र हे एक दिवस आधीच सोशल मीडियावर व्‍हायरल झाले आहे. ही पूर्वतयारी होती का. बंडखोर आमदारांबाबत अद्‍याप निर्णय झालेला नाही.

पात्र उमेदवारांनाच मतदानावेळी संधी देणे आवश्‍यक आहे. सध्‍या पात्र कोण आणि अपात्र कोण हेच स्‍पष्‍ट झालेले नाही. आम्‍हाला पुरेसा वेळ दिलेला नाही. विधानसभा उपाध्‍यक्षांचा बंडखोर आमदारांसंदर्भातील निर्णय होत नाही तोपर्यंत बहुमताबाबत कोणताही निर्णय घेवू नये, अशी विनंतीही त्‍यांनी केली.

राज्‍यपालांना पाठवलेल्‍या पत्रावर ३४ आमदारांच्‍या स्‍वाक्षरी

या वेळी खंडपीठाने सवाल केला की, आमदारांच्‍या अपात्रतेच्‍या सर्व प्रक्रियावर काय परिणाम होईल, असा सवाल यावेळी खंडपीठाने केला. अपात्र असणार्‍या उमेदवारांनी मतदान केले आणि उद्‍या विधानसभा उपाध्‍यक्षांनी त्‍याला अपात्र ठरवले तर त्‍यांचे मतच वैध ठरणार नाही. ही प्रक्रियाच लोकशाहीविरोधी ठरेल.

यावेळी सिंघवी यांनी राज्‍यपालांना पाठविण्‍यात आलेले पहिल्‍या पत्रावर ३४ आमदारांच्‍या स्‍वाक्षरीचे पत्र होते. पक्षांतर बंदी कायदान्‍वये दोन तृतीयांश बहुमताची आवश्‍यकता आहे.

बंडखोर आमदारांनी पक्षाचे सदस्‍यत्‍व सोडले नसले तरी त्‍यांचे कृत्‍य हे पक्ष सोडला, असे म्‍हणण्‍यास भाग पडते. त्‍यामुळे अपात्र आमदारांबाबत विधानसभा उपाध्‍यक्षांनी निर्णय घेतल्‍यानंतर बहुमत चाचणी घेण्‍यात यावी, अशी मागणी केली.

काही आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. काही जण विदेशात आहेत. त्‍यामुळे बहुमत चाचणी थांबवावी, अशी मागणी आम्‍ही मागील सुनावणीवेळीच केली होती. त्‍यावेळी न्‍यायालयाने याची दखल घेतली जाईल, असे म्‍हटले होते, असेही सिंघवी यांनी यावेळी सांगितले.

असे समजूया की, सरकारला जाणीव झाली की आपण बहुमत गमावत आहोत. अशावेळी जे सरकारचा पाठिंबा काढून घेणार आहेत त्‍यांना अपात्र ठरविण्‍याचा निर्णय विधानसभा अध्‍यक्ष घेवू शकतात.

अशा वेळी बहुमत चाचणीसाठी राज्‍यपालांनी वाट पाहावी की, त्‍यांना कलम १७४ कलमान्‍यवये असणारा अधिकाराचा वापर करावा, हा मुद्‍दा महत्त्‍वाचा ठरतो, असे निरीक्षणही खंडपीठाने यावेळी नोंदवले.

बहुमत चाचणीसाठी एवढी घाईगडबड कशासाठी?

बंडखोर आमदारांच्या अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्‍च न्‍यायालयात तहकूब करण्‍यात आली आहे. कोरोनामधून राज्‍यपाल नुकतेच बरे झाले आहेत. यानंतर तत्‍काळ राज्‍यपालांना विरोधी पक्ष नेते भेटले.

या भेटीनंतर त्‍यांनी तत्‍काळ उद्‍याच बहुमत चाचणी घ्‍या, असा आदेश दिला. मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरे यांच्‍याशी चर्चा करणे आवश्‍यक होते. ते न करताच बहुमत चाचणीसाठी एवढी घाईगडबड कशासाठी, असा युक्‍तीवाद सिंघवी यांनी केला.

राज्‍यपालांनी घेतलेल्‍या निर्णयाची समीक्षा करण्‍याचा अधिकार सर्वोच्‍च न्‍यायालयास आहे, असेही ते म्‍हणाले. शिवसेनेचा अधिकृत व्‍हिप कोण आहेत. माझ्‍या पक्षाकाराची निवड खूप आधी झाली होती, असेही सिंघवी यांनी न्‍यायालयास सांगितले.

न्‍याय तेव्‍हाच होईल जेव्‍हा तुम्‍ही विधानसभा अध्‍यक्षांना दिलेल्‍या ११ जुलैपूर्वीचा अधिकाराचा वापर करण्‍याची परवानगी द्‍यावी, तसेच बहुमत चाचणी तत्‍काळ न घेता ती लांबणीवर टाकावी, अशी मागणी त्‍यांनी न्‍यायालयाकडे केली.

घोडेबाजार रोखण्‍यासाठी बहुमत चाचणी हाच पर्याय : कौल यांचा युक्‍तीवाद

शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्‍तीवाद करताना सांगितले की, बहुमत चाचणी लांबणीवर टाकू नये. कारण घोडेबाजार रोखण्‍याचा हाच एकमेव पर्याय आहे.

न्‍यायालयात आम्‍ही दाद मागितली तेव्‍हाच आमच्‍याकडे बहुमत होते. म्‍हणजे सर्वप्रथम विधानसभा उपाध्‍यक्षांच्‍या अविश्‍वासावर प्रस्‍तावावर निर्णय व्‍हावे, असे तुम्‍हाला वाटते का, असा सवाल खंडपीठाने केला.

राज्‍यपालांच्‍या अधिकाराला मंत्रीमंडळाच्‍या सल्‍ल्‍याची गरज नाही

राज्‍यपालांचा निर्णय अवाजवी दिसत नाही तोपर्यंत त्‍यात हस्‍तक्षेप करता येणार नाही. तसेच राज्‍यपालांच्‍या अधिकाराला मंत्रीमंडळाच्‍या सल्‍ल्‍याची गरज नाही.

मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावले त्‍याच क्षणी त्‍यांनी सत्तेत राहण्‍याची इच्‍छा नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे. तसेच विरोधी पक्ष येथे बहुमताची मागणी करत आहे. सत्ताधारी पक्ष बहुमताची मागणी करतात. तसेच बहुमत चाचणी लवकर व्‍हावी, अशी मागणी सर्वोच्‍च न्‍यायालयात केली जाते. हेच सरकार बहुमत चाचणीला घाबरत आहे.

सरकार बहुमत चाचणीला का घाबरत आहे, असा सवालही त्‍यांनी विचारला. अपात्रतेची नोटीस आणि बहुमत चाचणीचा कोणताही संबंध नाही, हे दोन पूर्णपणे भिन्‍न विषय आहेत, असा युक्‍तीवादही त्‍यांनी केला.(स्रोत:पुढारी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 25, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

आनंदवार्ता! ‘या’ वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

August 20, 2026
Next Post
महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

राजीनामा! महाविकास आघाडी सरकार कोसळलं; उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्री व विधानपरिषद आमदारकीचा दिला राजीनामा

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा