टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा एस.टी. बस स्टॅन्डमध्ये एस.टी बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील बारा तोळे सोन्याचे विविध दागिने ठेवलेले पॉकेट
चोरट्यांनी पळवले असून चोरीला गेलेल्या दागिन्याची किंमत ४ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.
सदर चोरी ही दुपारी एकच्या सुमारास घडली असून कलावती मारुती जाधव (वय ५५ रा.मंगळवेढा) यांनी याबाबत पोलीसात फिर्याद दिली आहे.
त्या पती मारुती जाधव यांच्यासह मंगळवेढा बस स्थानकावरुन सांगोल्याकडे जाण्यासाठी सांगोला बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने ठेवलेले पॉकेट पळवले.
या पाकीटात साडेचार तोळ्याचे सोन्याचे गंठण, सोन्याची साखळी, लॉकेट, लक्ष्मीहार असे बारा तोळ्याचे सोन्याचे दागिने होते.
चोरीला गेलेल्या या दागिन्याची किंमत ४ लाख ६० हजार इतकी होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज