टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील एका ३२ वर्षीय युवकाने दारूच्या नशेत अज्ञात कारणावरून राहते घरात पत्र्याच्या वाशाला गळफास घेवून आत्महत्या केली.
दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी आकस्मात मयत अशी पोलिसांत नोंद झाली असून सोमनाथ विठ्ठल कुंभार असे आत्महत्या करणाऱ्या त्या युवकाचे नाव आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील मयत सोमनाथ कुंभार याने दि .७ रोजी दुपारी १.०० वा. दारूच्या नशेत अज्ञात कारणावरून राहते घरात साडीने पत्र्याच्या वाशाला गळफास लावून आत्महत्या केली.
याबाबतची खबर रामचंद्र कुंभार याने पोलिसांत दिली आहे. या घटनेवेळी खबर देणारा हा दामाजी कारखाना येथे कामानिमित्त गेले होते.
त्यांच्या पत्नीने मोबाईलवर कळविल्यानंतर त्यांनी पोलिसात मयताची खबर दिली आहे.
दरम्यान पोलिस हवालदार महेश कोळी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. या घटनेचा पोलिस कसून तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज