
टीम मंगळवेढा टाईम्स । देवानंद पासले
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरने चालू गाळप हंगामात ११ मार्चअखेर ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे.
उर्वरित दिवसांत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी दिली.
अनिल सावंत म्हणाले, कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत, अध्यक्ष शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात ऊस गाळप सुरळीत सुरू आहे.
शेती खात्याकडून नियमित ऊसपुरवठा झाल्यामुळे ऑक्टोबरपासून गाळपामध्ये सातत्य राहिले. प्रतिदिन सरासरी ४२०० मेट्रिक टन ऊस गाळप केले.
यासाठी सरव्यवस्थापक रवींद्र साळुंखे , कार्यशाळा व्यवस्थापक नानासाहेब पोकळे, प्रक्रिया सरव्यवस्थापक अनिल पोरे, वीज अभियंता राजाराम कोरे, शेती अधिकारी कृष्णदेव लोंढे यांनी प्रयत्न केले.

शेतकरी, तोडणी ठेकेदार, वाहतूक ठेकेदार यांचेही सहकार्य लाभले. पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












