टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील उद्योजक नितीन मर्दा यांच्या मुलाने चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.
यश नितीन मर्दा याने आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर सातत्यपूर्ण अभ्यास करून यंदाच्या चार्टर्ड अकाउंटटची परीक्षा दिली होती.
त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्या परीक्षेत यश चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन उज्वल यश संपादन केले आहे.
मंगळवेढा येथील प्रसिद्ध कापड व्यापारी श्री गंगाराम हरिलाल मर्दा यांचे पणतू यश नितीन मर्दा हे चार्टर्ड अकाऊंट या परीक्षेत बाजी मारली आहे.
यश याचे दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे व बारावीचे शिक्षण देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे झाले आहे.
मर्दा कुटुंबातील ही तिसरी पिढी आता सीए झाली आहे.यश व मर्दा कुटुंबांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज