mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा मृत्यू; घात की अपघात? पतीसह तिघांना अटक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 23, 2022
in क्राईम, सोलापूर
थरार नाटय! मंगळवेढा शहरातील भर चौकात एकावर खुनीहल्ल्या प्रकरणी आरोपीस पोलिसांनी केले गजाआड

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावातील एका शेततळ्यात शुक्रवारी आईसह दोन मुलींचा मृतदेह आढळून आला होता.

त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्या घटनेला आता वेगळे वळण लागले आहे.

सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा बळी घेतल्याचा आरोप मृत सारिका अक्षय ढेकळे यांची आई लक्ष्मी सुरवसे यांनी केला आहे.

लक्ष्मी सुरवसे यांच्या फिर्यादीनुसार दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तर सारिका हिचा पती अक्षय ढेकळे, सासरा उत्तम मच्छिंद्र ढेकळे आणि दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे (सर्वजण रा. पाथरी, ता. उत्तर सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक अरूण फुगे यांनी याबाबतची माहिती दिली

सारिका आणि अक्षय यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता. विवाहात मानपान केला नाही, चांगला आहेर केला नाही, सोने दिले नाही, याचा राग मनात धरून पतीसह कुटुंबातील व्यक्‍तींकडून सारिकाचा अपमान करण्यात येत होता. तसेच दोन मुलीच झाल्यानेही तिला त्रास दिला जात होता.

नवीन कपडे घेऊ न देणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठविणे, फोनवर माहेरी बोलू न देणे आदी बाबींना कंटाळून सारिका हिने तिच्या दोन्ही मुलींसह आपले जीवन संपवले होते.

सारिकाचा पती अक्षय याने ‘शेतात पाखरे राखायला गेल्यानंतर पत्नीचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्या तिघींचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने सखोल तपास सुरू केला होता.

सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक डी. एस. दळवी यांनी त्यासंबंधीची चौकशी केली. तत्पूर्वी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. त्यानंतर मयताचा पती अक्षय उर्फ आकाश ढेकळे, सासरा उत्तम मच्छिंद्र ढेकळे,

अनिता उत्तम ढेकळे, अण्णासाहेब उत्तम ढेकळे, पूजा अण्णासाहेब ढेकळे, विलास सुरवसे, सोजरबाई विलास सुरवसे, साळुबाई बाळा गुंड, बाळा गुंड आणि छकुली यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

सारिका ढेकळे यांना दोन मुलीच झाल्याने सासरच्यांनी त्यांचा छळ सुरु केला होता, ही माहिती समोर आली आहे सारिकाची आई त्यांचा कौटुंबिक वाद मिटवायला शुक्रवारी मुलीच्या सासरी गेल्या होत्या. त्या त्यांच्या गावी गेल्यानंतर काही वेळातच सारिकाने दोन्ही मुलींसह आत्महत्या केली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर

संबंधित बातम्या

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाची धग वाढणार! सोलापूर जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या चार तोफधडक सभा

August 6, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
Next Post
कोरोना लसीचा डोस घेतल्यावर ‘हे’ पिता येणार नाही?.वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यात लस न घेतलेले लोक गावाला धोकादायक; कोरोनाबरोबर खेळू नका, बचाव करा

ताज्या बातम्या

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाची धग वाढणार! सोलापूर जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या चार तोफधडक सभा

August 6, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..