टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बठाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच बिभीषण बेदरे यांच्या विरूध्द ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आठ विरूध्द एक अशा पध्दतीने मंजूर करण्यात आला आहे.
बठाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच बिभिषण बेदरे यांचे विरूद्ध ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांनी तहसिलदार स्वप्निल रावडे यांचेकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.
या ठरावाबाबत काल दि.२० जानेवारी रोजी निर्णय होवून मंजूर करण्यात आला.
बठाण गावचा वाळू लिलाव नुकताच झाला असून या माध्यमातून बठाण गावाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. या वाळू लिलावातून अविश्वास ठराव आणला गेल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
उपसरपंच हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, शासनाच्या विविध योजना राबविण्यास विरोध करतात, सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचा खर्च मनमानी पद्धतीने करतात,
ग्रामपंचायतीने बहुमताने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास आदि टाळाटाळ करतात या कारणांवरून उपसरपंच बिभिषण बेदरे यांचे विरूद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता.
त्यावर ग्रा.पं.सदस्य रामदास बेदरे, प्रभाकर बेदरे, सुप्रिया बाबर, इंदुमती घोडके, मनिषा शिंदे, आनंदी बेदरे, सुधाकर घोडके, माया कोडगर आदिंनी दाखल केलेला अविश्वास ठराव ८ विरूद्ध १ असा मंजूर करण्यात आला.
याप्रसंगी तहसीलदार स्वप्नील रावडे, गौण खनिज विभागाचे उमाकांत मोरे आदी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज