mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यात आज जयपूर येथे पहिला ट्वेन्टी-२० सामना; रोहित-राहुल द्रविड पर्वाला प्रारंभ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 17, 2021
in राष्ट्रीय
दुसऱ्या पर्वात चेन्नईची विजयी सुरुवात; मुंबईचा 20 धावांनी पराभव

टीम मंगळवेढा टाईम्स।

भारतीय क्रिकेटमध्ये आज बुधवारपासून रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या नव्या कर्णधार-प्रशिक्षक जोडीच्या पर्वाला प्रारंभ होईल.

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अपयश मागे सारून जयपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने भारताचे खेळाडू मैदानात उतरतील.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताला यंदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. कोहलीने स्पर्धेपूर्वीच ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता.

त्यातच रवी शास्त्री यांचाही मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. अशा स्थितीत पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी नव्याने संघबांधणी करण्याची भारताला संधी आहे.

त्यामुळे ‘आयपीएल’मध्ये आपल्या कल्पक नेतृत्वाने मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपदाचा किताब मिळवून देणारा रोहित आणि युवा खेळाडूंना पैलू पाडण्यात पटाईत असलेला द्रविड यांची जोडी भारतासाठीही मोलाचे योगदान देईल अशी तमाम चाहत्यांना अपेक्षा आहे.

दरम्यान, जयपूरच्या सभोवताली असणाऱ्या शहरांत सध्या प्रदूषणात वाढ झाली असून पहिल्या लढतीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करून भारत विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने कसोटी मालिकेपूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी, या हेतूने ट्वेन्टी-२० मालिकेत न खेळण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज टिम साऊदी न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे.

डेवॉन कॉन्वेसुद्धा दुखापतीमुळे मुकणार असल्याने डॅरेल मिचेल, मार्टिन गप्टिल यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. लॉकी फग्र्युसनचे पुनरागमन झाल्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजीची ताकद वाढली आहे.

कोहली, शिखर धवन यांसारख्या प्रमुख फलंदाजांच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर या युवा फळीच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल.

रोहितच्या साथीने महाराष्ट्राचा ऋतुराज सलामीला येण्याची शक्यता असून मुंबईकर सूर्यकुमार यादवचे मधल्या फळीतील स्थान पक्के मानले जात आहे.

अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला सुमार कामगिरीमुळे या मालिकेतून वगळण्यात आल्यामुळे त्याच्याऐवजी वेंकटेश अय्यरला छाप पाडण्याची संधी आहे. भुवनेश्वर कुमार भारताच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करेल. रविचंद्रन अश्विन फिरकीची धुरा वाहील.(स्रोत:लोकसत्ता)

वेळ : सायंकाळी ७ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत-न्यूझीलंड सामना

संबंधित बातम्या

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता ‘तारीख पे तारीख’ नाही; कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच

March 30, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 11, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं; नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

February 15, 2026
Next Post
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

पालकांनो! शाळेबाबत मोठी बातमी; पहिलीपासूनच्या शाळा सुरु होणार

ताज्या बातम्या

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

April 19, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा