mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! मंगळवेढा आगारातील सहा कर्मचार्‍यांना कारवाईच्या नोटीसा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 12, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढ्यातील ‘त्या’ बोगस दाखल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ; ग्रामसेवकाला बजावली कारणे दाखवा नोटीस

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा आगारातील कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यासाठी बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका ठेवून पाच चालक व एक वाहक अशा सहा कर्मचार्‍यांना एस.टी.महामंडळाच्या आगार प्रमुखांनी कारवाईच्या नोटीसा बजावून पंधरा दिवसाच्या आत खुलासा मागविला आहे.

मंगळवेढा आगारातील काही चालक,वाहकांना दि.3 नोव्हेंबर रोजी डयुटी लावली होती. ते कर्तव्यावर न येता व प्रशासनास कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता गैरहजर राहून दि.4 पासून नियमबाह्य काम बंद आंदोलन करून आगारातील इतर कर्मचार्‍यांना कामबंद आंदोलनात

सहभागी होण्यासाठी चिथावणी देवून स्थानिक राजकीय लोकांना हाताशी धरून आगाराचे गेट बंद करून गेटसमोर बसून बसेसची आडवणूक केली.त्यामुळे आगारातून बसेस मार्गस्थ होण्यास अडथळा निर्माण झाला.

तसेच न्यायालयाने संप अवैध ठरवून प्रतिबंधात्मक अंतरीम आदेश पारित केला असतानाही कर्मचार्‍यांनी बेकायदेशीर संप सुरु ठेवला असल्याने महामंडळाला दिवाळी वाहतूक करता आली नाही. त्यामुळे महामंडळाची आर्थिक हानी झाली आहे.

तसेच प्रवाशांचीही गैरसोय झाल्याचे दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करून पंधरा दिवसाच्या आत खुलासा मागविण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत खुलासा न आल्यास गैरहजेरीत एकतर्फी निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे.

मंगळवेढयात खाजगी वाहतुकीला ऊत-गेली पंधरा दिवस विनाथांबा कर्मचार्‍यांचा संप सुरु असल्याने याचा परिणाम एस.टी.वर झाला असून  ,एकही एस.टी.आगारातून बाहेर पडत नसल्यामुळे याचा गैरफायदा खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी मोठया प्रमाणात घेत असल्याचे चित्र आहे.

दि.11 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.00 वा. मंगळवेढा ते पुणे जाण्यासाठी एकाच वेळी सात मिनी ट्रॅव्हल्स खचाखच मेंढरे कोंबल्याप्रमाणे प्रवासी कोंबून वाहतूक केली जात असल्याने अपघात घडल्यास याला कोण जबाबदार? असा सवाल करून यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्‍न जनतेतून विचारला जात आहे.

आर.टी.ओ. व वाहतूक शाखेचे पोलिसही यावर मूग गिळून गप्प असल्याने अशा वाहतूकीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.

एस.टी.ला मंगळवेढा ते पुणे 350 रुपये तिकीट असताना खाजगी ट्रॅव्हल्सवाले 500 रुपये घेत असल्याने अक्षरशः प्रवाशांची डोळयादेखत लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत.

कॅबीनमध्ये चालकाशिवाय अन्य व्यक्तींना बसण्यास परवानगी नसतानाही खाजगीवाले कॅबीनमध्ये प्रवासी बसवून वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नोटीस

संबंधित बातम्या

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 4, 2026
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

अखेर प्रतीक्षा संपली! महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी महत्त्वाची पाऊले; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 4, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

​अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह जुगाऱ्यांचा खेळ खंडोबा

July 4, 2026
मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

मंगळवेढ्यात खळबळ! नामांकित शाळेच्या प्रवेशद्वारावरच मध्यरात्री ‘अघोरी पूजा’; संशयिताविरुद्ध पोलिसांत तक्रार

July 4, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सभापती दीपाली ताड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! मंगळवेढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन शिक्षक; ​पालक वर्गातून व्यक्त होतोय आनंद

July 3, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार

July 3, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

कोर्टाच्या चकरा मारण्यापासून सुटका! मंगळवेढा दिवाणी न्यायालयात ‘विशेष लोकअदालत’; वाद मिटवण्याची मोठी संधी

July 3, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
Next Post

Breaking! मंगळवेढ्यात भरदिवसा तरुणावर खुनी हल्ला; पोलीस व बँकेतील सुरक्षारक्षका मुळे मोठा अनर्थ टळला

ताज्या बातम्या

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 4, 2026
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

अखेर प्रतीक्षा संपली! महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी महत्त्वाची पाऊले; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 4, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

​अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह जुगाऱ्यांचा खेळ खंडोबा

July 4, 2026
मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

मंगळवेढ्यात खळबळ! नामांकित शाळेच्या प्रवेशद्वारावरच मध्यरात्री ‘अघोरी पूजा’; संशयिताविरुद्ध पोलिसांत तक्रार

July 4, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सभापती दीपाली ताड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! मंगळवेढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन शिक्षक; ​पालक वर्गातून व्यक्त होतोय आनंद

July 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..