mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीज कनेक्‍शन तोडणीला स्थगिती; आ.समाधान आवताडे यांनी उठवला होता आवाज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 29, 2021
in मंगळवेढा, राज्य
कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकीची रक्कम भरा, शेतकर्‍यांना वीज बिलात 50 टक्के माफी देण्याचा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स ।

अतिवृष्टीत वाचलेली पिके सध्या पाण्याअभावी कोमेजून चालली आहेत. विहिरी व बोअरला पाणी आहेल परंतु पाणी देण्यासाठी वीज नाही, अशी विचित्र स्थिती सध्या सोलापूरच्या ग्रामीण भागात आहे.

थकित विज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणने सुरु केलेल्या कृषी पंपाच्या वीज तोडणी मोहिमेमुळे बळीराजा संकटात सापडला होता. जिल्ह्यातील बळीराजाची हीच कैफियत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यापर्यंत पोहोचविली आहे.

ऊर्जामंत्री राऊत यांनी त्याची दखल घेत कृषी पंप कनेक्‍शन तोडण्याची मोहीम थांबविण्याची सूचना सोलापूर महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना केली आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर होणारी विज तोडणी आता थांबल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी कृषी पंप कनेक्‍शन तोडण्याचा मोहिमेचा मुद्दा उपस्थित केला होता.

शेतकरी पैसे भरायला तयार आहेत परंतु त्यांना मुदत हवी आहे. त्यांनी किती पैसे भरले आहेत आणि किती पैसे शिल्लक आहेत? याची माहिती त्यांना मिळायला हवी. विज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना १५ मार्चपर्यंत मुदत द्या अशी आग्रही मागणी आमदार शिंदे यांनी या बैठकीत केली होती.

या मागणीवर भाजप आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत व आमदार राम सातपुते यांनीही आवाज उठविला होता.

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी आपण ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेटू तुम्ही सर्व आमदार मुंबईला या असे आश्वासन सोमवारच्या बैठकीत दिले होते.

ऊर्जामंत्री राऊत यांच्याकडे जाण्यासाठी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे वगळता जिल्ह्यातील एकही आमदार उपस्थित राहिले नव्हते. पालकमंत्री भरणे, आमदार संजय शिंदे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष सुळे हे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे गेले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कैफियत त्यांनी मांडली.

संध्याकाळपर्यंत आदेश देतो असे आश्वासन ऊर्जामंत्री राऊत यांनी दिले होते. त्यानुसार आज ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने सोलापूरचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना कृषी पंपाची वीज तोडणी मोहीम स्थगित करण्याची सूचना करण्यात आली आहे.(स्रोत:सकाळ)

शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाचे हप्तेही पाडून दिले जाणार

सोलापूर जिल्ह्यातील कृषी पंपांचे वीज कनेक्‍शन दिवाळीपर्यंत तोडले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाचे हप्तेही पाडून दिले जाणार आहेत. कृषी पंप धोरणामध्ये जे शेतकरी सहभागी होतील,

त्यांचे ६५ टक्के वीजबिल माफ केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी भरलेल्या थकीत वीज बिलापैकी ६६ टक्के रक्कम दोन टप्प्यात त्याच ग्रामपंचायतीतील वीज वितरण दुरुस्तीच्या कामासाठी वापरली जाणार आहे.- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडे

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
Next Post

जुनी पेन्शन योजना लागू करावी; मंगळवेढयातील गुरुजींचे ठिय्या आंदोलन

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..