mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

टी-20 वर्ल्डकपचा थरार आजपासून; पहिल्याच दिवशी दोन लढतींची रंगत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 17, 2021
in राष्ट्रीय
टी-20 वर्ल्डकपचा थरार आजपासून; पहिल्याच दिवशी दोन लढतींची रंगत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

टी-20 वर्ल्ड कपचा थरार तब्बल पाच वर्षांनंतर अनुभवायला मिळणार आहे. ओमान व यूएई या दोन देशांमध्ये आजपासून टी-20 या प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

पहिल्या फेरीतील लढती आजपासून खेळवण्यात येणार असून 23 ऑक्टोबरपासून ‘सुपर 12’ फेरीला सुरुवात होईल. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ओमान भिडणार पीएनजीला तर स्कॉटलंडसमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे.

16 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 45 लढती पार पडणार असून 14 नोव्हेंबरला जेतेपदाचा फैसला होणार आहे.

श्रीलंका, बांगलादेशचे पारडे जड

पहिल्या फेरीला रविवारपासून सुरुवात होणार आहे. या फेरीमध्ये आठ देश ‘सुपर 12’ फेरीत पात्र ठरण्यासाठी जिवाचे रान करताना दिसतील.

श्रीलंका व बांगलादेश हे दोन संघ पुढल्या फेरीसाठी पात्र ठरतील अशी शक्यता क्रिकेटतज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच आयर्लंड, नेदरलॅण्ड, स्कॉटलंड व ओमान या संघांमध्ये ‘सुपर 12’ फेरीत पात्र ठरण्यासाठी रस्सीखेच लागू शकते.

आठ देश थेट ‘ सुपर 12’ साठी पात्र

यजमान देश व रँकिंगमधील सर्वोत्तम देशांना थेट ‘सुपर 12’ फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.

गट एकमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज या देशांचा समावेश असून

गट दोनमध्ये अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान व न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे.

पहिल्या फेरीतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या चार संघांना दोन्ही गटांत प्रत्येकी दोन संघांप्रमाणे समाविष्ट केले जाणार आहे.

या लढतींवर असणार नजरा

23 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका, अबुधाबी

23 ऑक्टोबर – इंग्लंड-वेस्ट इंडीज, दुबई

24 ऑक्टोबर – भारत-पाकिस्तान, दुबई

30 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, दुबई

31 ऑक्टोबर – भारत-न्यूझीलंड, दुबई

6 नोव्हेंबर – इंग्लंड-दक्षिण आफ्रिका, शारजा

पहिल्या फेरीतील चार संघांना पुढल्या फेरीत प्रवेश मिळणार

पहिल्या फेरीत प्रत्येकी चार देशांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. ‘ए’ गटामध्ये आयर्लंड, नामिबिया, नेदरलॅण्ड व श्रीलंका या देशांचा समावेश आहे.

‘बी’ गटामध्ये बांगलादेश, ओमान, पीएनजी स्कॉटलंड या देशांचा समावेश आहे. दोन्ही गटांतील सर्वोत्तम दोन संघ पुढल्या अर्थातच ‘सुपर 12’मध्ये प्रवेश करतील.

पहिल्या फेरीतील गटवारी

गट ए – आयर्लंड, नामिबिया, नेदरलॅण्ड, श्रीलंका

गट बी – बांगलादेश, ओमान, पीएनजी, स्कॉटलंड

सुपर 12 फेरीतील गटवारी

गट एक – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, ए वन, बी 2

ग़ट दोन – अफगाणिस्तान, पाकिस्तान, हिंदुस्थान, न्यूझीलंड, ए 2, बी 1

आजच्या लढती

ओमान – पीएनजी , गट बी

अल अमिरात, दुपारी 3.30 वाजता

बांगलादेश – स्कॉटलंड , गट बी

अल अमिरात, रात्री 7.30 वाजता.(स्रोत:सामना)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: टी-20 वर्ड कप

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
Next Post
खळबळ! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी अजित मिसाळ व गणेश पवार यांच्या विरोधात लाच घेतल्याची तक्रार; उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू

खळबळ! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी अजित मिसाळ व गणेश पवार यांच्या विरोधात लाच घेतल्याची तक्रार; उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026

कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? राज्य सरकारची मोठी घोषणा; थेट तारीख सांगितली

June 28, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या खोल्या थेट ‘सील’, मोठ्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यात खळबळ; ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणार?

June 28, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

शेतात पाणी पोहोचेपर्यंत संघर्ष; चळवळीचा लढा थांबणार नाही; मंगळवेढ्यातील पाणी परिषदेत संघर्ष समितीचे शिवाजीराव काळुंगे यांनी दिला नारा

June 27, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

June 27, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा