mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 28, 2021
in राज्य, सोलापूर
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

टीम मंगळवेढा टाईम्स।

शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नसल्याने राज्यातील 27 व सोलापूर जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांवर साखर आयुक्त यांनी आरआरसीची कारवाई केली होती.

मात्र आरआरसी कारवाईचा कसलाच धाक साखर कारखानदारांना राहिला नाही. त्यामुळे कारवाईनंतरही एफआरपी ची रक्कम शेतकर्‍यांना अद्याप देण्यात आली नसल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना वेळेत एफआरपीची रक्कम न दिल्याने आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. काही निवडक साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना वेळेत एफआरपीनुसार रक्कम दिली आहे.

परंतु राज्यासह जिल्ह्यातील बर्‍याच साखर कारखान्यांनी एफआरपी न देणे, एफआरपी देण्यास विलंब लावणे, शेतकर्‍यांना एफआरपी अधिक देण्याचे आमिष दाखविणे, परंतु ती रक्कम न देणे, गाळपास नकार देणे, गाळपाच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना पैसे देणे,

नंतर मात्र रक्कम थकीत ठेवणे असे प्रकार राज्यातील साखर कारखानदारांनी केल्याच्या तक्रारी साखर आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी संघटनांच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या.

त्या अनुषंगाने आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. परंतु आरआरसीची कारवाई करूनही शेतकर्‍यांना उसाची बिले मिळत नसतील तर अशा कारवाईस कारखानदार घाबरत नसल्याचेच दिसून येते.

आरआरसी कारवाई करणे म्हणजेच संबंधित साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकर्‍यांची थकीत एफआरपी देणे गरजेचे आहे. दरम्यान, येत्या 15 ऑक्टोबरपासून राज्यासह जिल्ह्यातील ऊस गाळपाला सुरूवात होणार आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ज्या साखर कारखानदारांनी शेतकर्‍यांची एफआरपी थकविली आहे, अशा साखर कारखान्याला गाळप परवाना देणार नसल्याचे आदेश काढले आहेत.

परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी खरोखरच होणार का, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

कारण अनेक साखर कारखानदारांनी साखर आयुक्त यांच्याकडे एफआरपीची रक्कम दिल्याची आकडेवारी लेखापरीक्षण अधिकार्‍यांना हाताशी धरून दिली जात आहे. परंतु प्रत्यक्षात एफआरपीसाठी शेतकर्‍यांना कारखानदारांच्या दारात पाय झिजवावे लागत आहे.

राज्यात नियमित एफआरपी देणारे जवळपास 145 साखर कारखाने आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 17 साखर कारखान्यांचा समावेश आहे. तर विलंबाने एफआरपी देणारे जिल्ह्यातील 20 कारखाने आहेत.

वेळेत ऊस बिल देणार्‍या साखर कारखान्यालाच शेतकर्‍यांनी आपला ऊस द्यावा. त्यासाठी शेतकर्‍यांनी एफआरपीच्या कोणत्याही करारावर सह्या करू नयेत. एक रकमी एफआरपी घ्यावी. बरेच साखर कारखानदार एफआरपीची रक्कम पूर्ण दिल्याची खोटी माहितीही देत आहेत.
– विजय रणदिवे, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सोलापूर जिल्ह्यातील रेड झोनमधील असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर, संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मकाई सहकारी साखर कारखाना, संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना, लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, लोकमंगल इथेनॉल भंडारकवठे, सिद्धनाथ शुगर, गोकुळ शुगर, मातोश्री लक्ष्मी, विठ्ठल रिफाईंड, भीमा सहकारी साखर कारखाना, सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना अशा एकूण 13 कारखान्यांचा समावेश आहे.(स्रोत:पुढारी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विठ्ठल सहकारी साखर कारखानासंत दामाजी साखर कारखाना

संबंधित बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 18, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 18, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार सुट्ट्या

March 17, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

ब्रेकिंग! सोलापूर झेडपी अध्यक्षपदाचा पेच सुटणार? पालकमंत्र्यांकडे सर्वांच्या नजरा; ‘ही’ नावे आहेत सर्वात पुढे

March 16, 2026
Next Post

विद्यार्थ्यांनो! स्पर्धा परीक्षा, पोलीस भरतीच्या मागणीसाठी पंढरपुरात 'स्वाभिमानी'चा उद्या मोर्चा

ताज्या बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 18, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 18, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 18, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..