mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भगिरथ भालके चेअरमन असलेल्या विठ्ठल कारखान्यात कोट्यवधींचा घोटाळा; अभिजीत पाटील यांचा गंभीर आरोप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 27, 2021
in सोलापूर, राजकारण, राज्य
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत असतानाच आता कारखान्याच्या संचालक मंडळावर विविध आरोप होऊ लागले आहेत.

डीव्हीपी उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके व त्यांच्या संचालक मंडळावर साखर उतारा चोरुन 17 कोटींचा साखर घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या प्रकरणी सखोल चौकशी करुन संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. त्यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील साखर कारखानदारीत मोठी खळबळ उडाली आहे.

श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच कामगार, ऊस तोडणी – वाहतूकदारांची देणी थकवली आहेत. भ्रष्टाचार आणि गलथान कारभारामुळेच कारखाना अडचणीत आलेला आहे.

त्यामुळे तोट्याच्या रक्कमेचा बोजा चेअरमन आणि सर्व संचालकांच्या मालमत्तेवर चढवावा. शिवाय संचालक मंडळ बरखास्त करण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत सहमत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन धाराशीव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

‘डीव्हीपी’च्या कार्यालयात पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रा.महादेव तळेकर, हणमंत पाटील, सर्जेराव घाडगे, उमेश मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी पाटील यांनी श्री.विठ्ठल साखर कारखान्याच्या कारभाराविषयी गंभीर आरोप केले. कारखान्याच्या वार्षिक सभेच्या अहवालाची नोंद घेत असतानाकोणत्या संचालक व नातेवाईकांनी किती कर्जे घेतली ? थकवली आणि वसुलीबाबत काय कार्यवाही ? हे स्पष्ट केले पाहिजे , असे सांगून ते म्हणाले,

साखर, वीज, मोलॅसीस, डिस्टीलरी या माध्यमातून कारखान्याला मोठे उत्पन्न मिळत असते. यासह घेतलेल्या कर्जाचा विनियोग त्या-त्या गोष्टींसाठी केल्यास कारखाना तोट्यात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

मात्र, चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळाच्या गलथान, भ्रष्टाचारी कारभारामुळे सभासदांचा राजवाडा असलेला ‘विठ्ठल’ कारखाना अडचणीत आल्याचे दिसून येते.

शेतकरी, कामगार, ऊस वाहतूकदार यांची थकीत देणी देण्यासाठी सातत्याने तारखा दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात काहीच हाती लागत नाही.

संचालक मंडळाने आता निश्चित एक तारीख जाहीर करावी. त्यावेळेस देणी न दिल्यास त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचा ठराव सभासदांनी करावा. भंगार विक्रीसह अनेक गोष्टी संशयास्पद असून त्याबाबत सविस्तरण चौकशी झाली पाहिजे.

संस्थेच्या लेखा परिक्षकांनी सन २०१९-२० व २०२०-२१ या कालावधीतील लेखापरिक्षण अहवालाची माहिती द्यावी. तसेच दोष दुरूस्ती अहवाल सभासदांपुढे मांडावा. त्या दोषास जबाबदार असणाऱ्या सर्वावर कारवाई करावी.

चुकीच्या पद्धतीने लेखापरिक्षण केल्याने संस्थेचे लेखापरिक्षण केल्याने संस्थेचे नुकसान होत असून संबंधित लेखापरिक्षकांची पुन्हा नेमणूक करू नये. ‘जीएसटी’, कायदेशीर व इतर सल्लागार बदलावेत. ‘विठ्ठल’ हा संपूर्ण तालुक्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.

या संस्थेची सर्वसाधारण सभा कोरोनाचे नियम पाळून ऑफलाईन व खुल्या प्रांगणात घ्यावी. कोणाचा बोलण्याचा अधिकार हिरावून घेऊ नये. अन्यथा एक सभासद म्हणून येत्या काळात न्यायालयीन लढाही लढण्याची तयारी ठेवली असल्याचे पाटील यांनी नमुद केले.

संभ्रम दूर करावा

कारखान्याने एकीकडे शेतकरी, कामगार, ऊस वाहतूकदारांची कोट्यवधींची देणी थकवली आहेत. ती कधी देणार ? याविषयी कसलीही ठोस माहिती दिली जात नाही. तर दुसरीकडे ‘आरआरसी’ कारवाईचे आदेश असून यंदा कारखाना सुरू तरी करणार का ? हा संभ्रम निर्माण झाला आहे.

मात्र, कोणत्याही बाबतीत चेअरमन, व्हा.चेअरमन अथवा संचालक पुढे येऊन खुलासा करीत नाहीत, ही बाब दुर्दैवी आहे.या मंडळींनी सभासदांचा संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजित पाटीलविठ्ठल सहकारी साखर कारखाना

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 9, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 9, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 9, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

March 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; ​उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी ​

March 7, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

पावसाचा कहर! मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला; या पुलावर आले पाणी

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 9, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 9, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 9, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..