mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढेकरांनो! ज्वारीपासून बनणार पास्ता, बिस्कीट; सोलापुरातील शेतकऱ्यांचा नवा प्रयोग, असा करा अर्ज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 12, 2021
in सोलापूर, मंगळवेढा, राज्य
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

ज्वारीपासून आत्तापर्यंत कडक भाकरी, कुरवड्या, पापड बनविले जात होते. पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नवे मार्केटिंग आत्मसात केले असून, केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेतून कर्ज घेऊन बिस्किट, पास्ता, रवा बनविण्याचे कारखाने शेतात उभारण्याची तयारी केली आहे.

या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील १२१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना आणली आहे.

सोलापूर जिल्हा रब्बी ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत ज्वारीवर प्रक्रिया उद्योग उभारणीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

ज्वारीवर प्राथमिक, दुय्यम प्रक्रिया करून अन्न उद्योग उभारू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासाठी शेतकऱ्यांना प्रकल्प रकमेच्या ३५ टक्के किंवा जास्तीतजास्त १० लाख अनुदान दिले जाणार आहे. माढा, बार्शी, करमाळा तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आले आहेत असे कृषी विभागातील प्रकल्प समन्वयक एम.ए. पठाण यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी अर्ज करताना कोणता उद्योग उभारणार याचा प्रकल्प अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी नुसतेच अर्ज केले आहेत.

अशा शेतकऱ्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रकल्प सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्वारीपासून नवीन कोणते पदार्थ बनविता येतील याची वेबसाईटवर माहिती घेतली व पास्ता बनविण्याचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे मंगळवेढ्याचे शेतकरी मयूर भोसले यांनी सांगितले.

माढा व करमाळ्यातील शेतकऱ्यांनी बिस्किट, रवा, पापड, कुरवड्या बनविण्याचे प्रस्ताव दिले आहेत.

तालुकानिहाय उद्दिष्ट

मंगळवेढा:१०,सांगोला: १०,उत्तर सोलापूर: १०, दक्षिण सोलापूर: १०, मोहोळ: १०, अक्कलकोट: १०, पंढरपूर: १०, माळशिरस: १०, माढा: ५०, करमाळा: १५

कोणाला घेता येणार लाभ?

ज्वारीवर प्रक्रिया उद्योग उभारू इच्छिणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्यास कृषी विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येईल. त्याचबरोबर कंपनी, गटशेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी भागिदारी किंवा भाड्याची जागा असेल तर तसा करार जोडणे अपेक्षित आहे.

उद्योगास कर्ज देऊ इच्छिणाऱ्या बँका अर्जदारानेच निवडायच्या आहेत. कृषी विभाग फक्त अनुदानासाठी प्रकल्प शिफारस करेल. असा करा अर्ज

कृषी विभागाच्या पीएमएफएमई या वेबसाईटवर जाऊन अर्ज ओपन करायचा आहे. या अर्जात नावासह सर्व माहिती अचूक भरायची आहे. सोबत सात बारा, आधार, पॅनकार्ड, प्रकल्प अहवाल जोडायचे आहेत.

अर्जासोबत प्रकल्प अहवाल अपलोड नसेल तरी अर्ज सबमिट होतो. कृषी विभाग याची नोंद घेऊन संबंधित शेतकऱ्यास प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मदत करतो.

उद्योग, जागा, मशिनरी, बँक या गोष्टी शेतकऱ्यांनेच निवडायच्या आहेत. आत्मनिर्भर भारत अंतर्गत सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेत सोलापूर जिल्ह्यासाठी ज्वारीची निवड झाली आहे. ज्वारीवर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी १२१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

अजूनही शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. १५ शेतकऱ्यांचे उद्योग निवडले असून, त्यांना तातडीने कर्ज देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेतली जाणार आहे. – बाळासाहेब शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ज्वारी

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

मंगळवेढेकरांसाठी खुशखबर! ‘श्री सायकल कंपनी’मध्ये लहान मुलांच्या बॅटरी कार आणि जीपवर धमाकेदार ऑफर; सोबतीला नोकरीची सुवर्णसंधी

June 29, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! सात महिन्यांचं बाळ पोटातच गेलं, पती-पत्नीचाही जागीच अंत; एकाच चितेवर पेटली नवदांपत्याची चिता; सांगोल्यातील ‘त्या’ अपघाताने डोळ्यात येईल पाणी…

June 29, 2026
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

हे यमराजा, उद्या आमच्या बायका येतील पण…;  वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नक्की काय घडलं? पुरुषांनी फोडला हंबरडा; ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात आहे?

June 29, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! ​फक्त एक प्रश्न अन्‌ रक्ताचा सडा…, मेव्हण्याने भाऊजीवर केला प्राणघातक हल्ला; मंगळवेढ्यामध्ये नेमकं काय घडलं?

June 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026

कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? राज्य सरकारची मोठी घोषणा; थेट तारीख सांगितली

June 28, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या खोल्या थेट ‘सील’, मोठ्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यात खळबळ; ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणार?

June 28, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

शेतात पाणी पोहोचेपर्यंत संघर्ष; चळवळीचा लढा थांबणार नाही; मंगळवेढ्यातील पाणी परिषदेत संघर्ष समितीचे शिवाजीराव काळुंगे यांनी दिला नारा

June 27, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

June 27, 2026
Next Post
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

मंगळवेढ्यात दोन दिवसात पॉझीटीव्ह रुग्णाची संख्या बारावर; नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून घराबाहेर पडावे

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

मंगळवेढेकरांसाठी खुशखबर! ‘श्री सायकल कंपनी’मध्ये लहान मुलांच्या बॅटरी कार आणि जीपवर धमाकेदार ऑफर; सोबतीला नोकरीची सुवर्णसंधी

June 29, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! सात महिन्यांचं बाळ पोटातच गेलं, पती-पत्नीचाही जागीच अंत; एकाच चितेवर पेटली नवदांपत्याची चिता; सांगोल्यातील ‘त्या’ अपघाताने डोळ्यात येईल पाणी…

June 29, 2026
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

हे यमराजा, उद्या आमच्या बायका येतील पण…;  वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नक्की काय घडलं? पुरुषांनी फोडला हंबरडा; ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात आहे?

June 29, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! ​फक्त एक प्रश्न अन्‌ रक्ताचा सडा…, मेव्हण्याने भाऊजीवर केला प्राणघातक हल्ला; मंगळवेढ्यामध्ये नेमकं काय घडलं?

June 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026

कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? राज्य सरकारची मोठी घोषणा; थेट तारीख सांगितली

June 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..