mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विठ्ठलच्या चेअरमन पदावरून भगीरथ भालकेंना हटवा; युवराज पाटील यांची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 3, 2021
in राज्य, सोलापूर
विठ्ठलच्या चेअरमन पदावरून भगीरथ भालकेंना हटवा; युवराज पाटील यांची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स। 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकत्व स्वीकारलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांमध्ये दुही निर्माण झाली आहे.शेतकरी, कामगार आणि ऊस वाहतूक ठेकेदारांची थकीत देणी देण्यात कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके हे अपयशी ठरल्याने कारखान्याच्या संचालकांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

कारखान्याचे संस्थापक (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांचे नातू व ज्येष्ठ संचालक युवराज पाटील यांनी ही भगिरथ भालके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत या विषयाला तोंड फोडले आहे.

दरम्यान विठ्ठल साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावरुन पंढरपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर काय तोडगा काढतात, याकडेच पंढरपुरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक होता. या कारखान्यात 1997 मध्ये सत्तांतर झाले. तेव्हापासूनच कारखान्याची आर्थिक शिस्त बिघडली. त्यानंतर दिवंगत आमदार भारत भालके यांच्या 18 वर्षांच्या काळात कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले.

अलीकडच्या दोन-तीन वर्षांत तर कारखाना आर्थिक डबघाईल आला. मागील दोन वर्षांपूर्वी कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की संचालक मंडळावर ओढवली.

आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगिरथ भालकेंच्या हाती कारखान्याचा कारभारा दिला आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांत त्यांच्याकडूनही कारखान्याच्या कारभारात फारसी समाधानकारक प्रगती झाल्याचे चित्र दिसत नाही.

मागील दोन वर्षांपूर्वी गाळपास आलेल्या उसाची एफआरपी आणि कामगारांचा 21 महिन्यांचा पगार थकीत आहे. त्यातच ऊस वाहतूक ठेकेदारांचेही देणे थकीत राहिल्याने भालके यांच्याविषयी शेतकरी, कामगार आणि वाहतूक ठेकेदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

एफआरपीची रक्कम मिळावी; म्हणून शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलनही केले. वारंवार मागणी करुनही एफआपीची थकीत रक्कम मिळत नसल्याने शेतकरीही आता हतबल झाले आहेत.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठल साखर कारखान्याचे पालकत्व स्वीकारल्याचे जाहीर करुन आगामी काळात शेतकऱ्यांची थकीत देणी देऊ, असे निवडणुक प्रचार काळात आश्वासन दिले होते.

पोटनिवडणुक होवून तब्बल पाच महिने उलटून गेले आहेत. त्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या कारभारात लक्ष घातले नाही की शेतकऱ्यांच्या थकीत बिलासंदर्भात कुठलेही भाष्य केले नाही. शेतकऱ्यांच्या भावनांचा कडेलोट झाल्यानंतर 28 ऑगस्ट रोजी कारखान्याच्या संचालक मंडळाची एक बैठक झाली.

या बैठकीत कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी आठ दिवसांत पैशाचे नियोजन करून शेतकऱ्यांची व कामगारांची थकीत देणी देतो, अन्यथा त्यानंतर तुम्ही सांगाल; तो निर्णय मला मान्य असेल, असे संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर आश्वासन दिले होते.

आठ दिवसांची मुदत संपून चार दिवस उटलून गेले आहेत त्यानंतरही शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळाली नाही. त्यानंतर आता संचालकांनीच भगिरथ भालके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुरु केली आहे.

त्यातच आता कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी तर थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी सांगितले की, 2018-19 आणि 2019-20 या दोन गाळप हंगामातील शेतकऱ्यांचे सुमारे 30 कोटी, कामगारांचे 16 कोटी व ऊस वाहतूक ठेकेदारांचे 7 कोटी असे मिळून सुमारे 55 ते 60 कोटी रुपयांची थकीत देणी आहेत. थकीत रक्कम देण्यासंदर्भात संचालक मंडळाची 23 ऑगस्ट रोजी बैठक झाली होती.

या बैठकीमध्ये भालके यांनी आठ दिवसांत संपूर्ण थकीत रक्कम देतो, असे आश्वासन दिले होते. आठ दिवसांची मुदत संपून गेली आहे. त्यानंतरही त्यांनी कोणतीही तरतूद केली नाही. त्यामुळे भगिरथ भालके यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मार्ग मोकळा करावा.

या बाबत कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.(स्रोत:सरकारनामा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित जगतापभगीरथ भालकेयुवराज पाटीलविठ्ठल सहकारी साखर कारखाना

संबंधित बातम्या

सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
Next Post
परिचारकांची शरद पवारांच्या कार्यक्रमाला हजेरी आणि उमेश परिचारकांची राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा?

शेतकऱ्यांनो! बैल पोळा होणार आनंदात; युटोपियन शुगर्सकडून 50 रुपये प्रमाणे ऊस बिल बँक खात्यात जमा

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा