mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मामा मुंबई-पुण्याचा न्याय सोलापूरला का नाही? पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल नाराजी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 10, 2021
in सोलापूर, राज्य
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

टीम मंगळवेढा टाईम्स ।

अनलॉक उठविण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना नव्हे तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आहेत, असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आजवर ठणकावून सांगितले.

मात्र, रविवारी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील बैठकीचा दाखला देत सोलापुरातील निर्बंध आपण दोन दिवसांत शिथिल करू अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे पालकमंत्र्यांचा “गोड बोल पण रेटून बोल’ हा स्वभाव समोर आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 14 एप्रिलपासून राज्यभर कडक निर्बंध लागू झाले. मे महिन्यानंतर टप्प्या- टप्प्याने निर्बंध शिथिलतेचा निर्णय झाला.

मात्र, जुलैमध्ये डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला. सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत दुकाने सुरू ठेवणे आणि दर शनिवारी व रविवारी दुकाने बंद राहतील, असा तो निर्णय होता.

ज्या शहर-जिल्ह्यात रुग्णवाढ सर्वाधिक आहे, त्या ठिकाणी असे निर्बंध लागू झाले. 22 जिल्ह्यांमधील निर्बंध मागील काही दिवसांपूर्वी शिथिल झाले. मात्र, उर्वरित 14 जिल्ह्यांच्या यादीत पुणे, कोल्हापूर, सोलापूर शहर – ग्रामीणचा समावेश आहे.

मार्च 2020 पासून पूर्णवेळ सातत्याने दुकाने तथा व्यवसाय सुरू न राहिल्याने व्यापारी, उद्योजक, लहान-मोठे व्यावसायिक उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर वाढू लागला असून मुलांचे शैक्षणिक प्रश्‍नही वाढले आहेत.

सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळत नाही. हातावरील पोट असलेल्यांना दोनवेळचे पोटभर जेवण मिळत नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. तरीही, निर्बंध उठविण्यासंदर्भात पालकमंत्री ठोस भूमिका घेत नसल्याचे दुर्दैवच.

सोलापूर शहराच्या तुलनेत पुणे शहरातील कोरोनाची रुग्णवाढ मोठी असतानाही पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बैठक घेऊन दणक्‍यात निर्बंध शिथिलतेची घोषणा केली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जागृत झाले आणि त्यांनीही सोलापूर शहरातील निर्बंध शिथिलतेची भाषा सुरू केली.

मात्र, अजूनपर्यंत ठोस निर्णय झालाच नाही, हे विशेष. पुण्याचे पालकमंत्री निर्णय घेऊ शकतात, मग तुम्ही का नाही, असा प्रश्‍न व्यापारी विचारू लागले आहेत.

निर्बंध शिथिलतेसाठी पालकमंत्र्यांचे योगदान काय?

माझ्यासाठी सोलापूर नव्हे तर इंदापूर महत्त्वाचे असून इंदापूरकरांसाठी मी पालकमंत्रिपद सोडायला तयार आहे, अशी भूमिका दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वी घेतली होती. त्यांचे आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये अजूनही एकोपा झाल्याचे दिसत नाही.

आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पोषक वातावरण तयार होण्यासाठी सरकारकडून अधिकाधिक निधी मिळविणे आणि व्यापारी, व्यावसायिक, लघू उद्योजक, सुशिक्षित बेरोजगांरासाठी पालकमंत्र्यांनी सोयीचे निर्णय घेणे अपेक्षित आहे.

मागच्या वेळी शिवसेना नेते माजी आमदार दिलीप माने यांच्यासह काही नगरसेवकांनी व्यापाऱ्यांसोबत आंदोलन केल्यानंतर शहरातील निर्बंध शिथिलतेचा निर्णय झाला. त्या वेळी माझ्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

आता आंदोलन कोणीही केले नसून काहींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, महापालिका आयुक्‍तांनी प्रस्ताव पाठवूनही सकारात्मक निर्णय झालाच नाही. त्यामुळे पालकमंत्री निर्बंध शिथिलतेचा निर्णय होण्यासाठी खरोखरच प्रयत्न करतील का, अशी विचारणा होऊ लागली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पालकमंत्री दत्तात्रय भरणे

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! कर्जमाफीच्या दोन अटी केल्या रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला मिळणार फायदा?

July 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढणार? मोदींच्या सल्लागार परिषदेचा मोठा अहवाल; पण ‘या’ महिलांसाठी चिंतेची बातमी

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर

July 9, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जमिनींची होणार चौकशी; महसूलमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

July 10, 2026
Next Post
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर; या कालावधीदरम्यान करा अर्ज

ताज्या बातम्या

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा