mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संतापजनक! उपचारास गेेलेल्या मंगळवेढ्यातील कोरोना पॉझिटिव्ह ग्रामसेवकावर पोलिसांची दंडात्मक कारवाई

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 14, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
खळबळ! वाहने अडवून पैसे वसूल करणारा मंगळवेढ्यातील तोतया पोलीस ताब्यात

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर येथील देगाव टोळ नाक्यावर सलगर वस्ती पोलिसाकडून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला उपचारासाठी जातानाही दंडात्मक कारवाई केली जात असल्याने त्याचा आर्थिक फटका पॉझिटिव्ह रुग्णांना बसत असून पोलिस प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या घटनेची हकिकत अशी,घरनिकी ता.मंगळवेढा येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक मधुकर गुलाब पवार (वय 48) हे कर्तव्यावर असताना पॉझिटिव्ह आले होते.त्यांच्यासोबत त्यांची आई,पत्नी व मुलगा असे कुटुंबच पॉझिटिव्ह आल्याने हे सर्वजण सोलापूर येथे उपचारासाठी गेले होते.

उपचार करून दि.12 मे रोजी सायंकाळी 5.45 वा. मंगळवेढयाकडे एम एच.13 सी.के. 1091 या चार चाकी वाहनातून येत असताना सोलापूर देगाव येथील टोळ नाक्यावर असलेल्या एका अधिकार्‍यासह चार पोलिस कर्मचार्‍यांनी त्यांचे वाहन अडवून तुमच्याकडे पास नसल्याने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे बजावले.

यावर ग्रामसेवक पवार यांनी जिल्हयात पासची गरज नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर पोलिसांनी पासला बगल देत मास्क नसल्याचे सांगून पाचशे रुपये दंडाची पावती फाडली.

यावर ग्रामसेवक पवार म्हणाले,आम्ही सर्वजण मास्क लावले असताना दंड कशासाठी अशी विचारणा केली असता दवाखान्याला पाच लाख रुपये बिल भरता इकडे पाचशे रुपये दंड भरावयास जास्त आहे का असा सवाल करून ग्रामसेवकाच्या हातावर दंडाची पावती टेकवली.

यावेळी ग्रामसेवक पवार यांनी आम्ही सर्व कुटुंब पॉझिटिव्ह असल्याने उपचारासाठी सोलापूरला गेलो होतो. संबंधित डॉक्टरांची  फाईलही दाखवली.तसेच मी सरकारी ग्रामसेवक कर्मचारी असून कोरोनाच्या पहिल्या फळीत काम करणारे आहोत.

त्याचबरोबर त्यांनी स्वतःचे ओळखपत्रही दाखवले मात्र पोलिस कुठल्याही परिस्थितीत त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नव्हते.परिणामी अखेर ग्रामसेवकाने खिशातील पाचशे रुपये काढून दंडाची रक्कम भरल्यानंतर त्या पॉझिटिव्ह पवार कुटुंबाची सुटका झाली.

शासनाने मोकाट फिरणार्‍यावर ,मास्क न लावणे,बाहेरच्या जिल्हयातून येणार्‍यांची पासची तपासणी करणे,चार चाकी वाहनात आर.टी.ओ पासींगच्या 50 टक्केच्या पुढे प्रवासी असल्यास कारवाई करणे आदीबाबत कारवाईसाठी पोलिस प्रशासनास सूचना देण्यात आल्या असताना येथे मात्र चक्क पोलिस स्थानिक पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनाच दंडात्मक कारवाई करून कसा त्रास देतात.

याचे ज्वलंत उदाहरण नुकतेच नागरिकांना पहायवयास मिळाले असून शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी  यापुढे अशा घटना घडून नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी तसेच या घटनेची चौकशी करून संबंधित पोलिस कर्मचार्‍यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मी सरकारी नोकरदार असून कारवाई

माझे कुटुंब पॉझिटिव्ह आल्याने उपचार करून मंगळवेढयाकडे परत येत असताना देगाव  टोळ नाक्यावर सलगर वस्ती पोलिसांनी पास नसल्याच्या कारणावरून दंडात्मक कारवाई केली.

सोलापूर जिल्हयात पासची आवश्यकता नसल्याचे सांगताच मास्कची कारवाई म्हणून पाचशे रुपये दंड आकारला, दवाखान्याला लाखो रुपये बिले भरता इकडे पाचशे रुपये दंड भरण्यास तुम्हाला काय झाले? असे म्हणून दंड वसूल केला.

मी सरकारी नोकरदार व कोरोना काळात पुढच्या फळीत काम करीत आहे.पोलिस आयुक्त यांनी चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करावी. – मधुकर पवार, ग्रामसेवक घरनिकी, मारापुर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना पॉझिटिव्हमंगळवेढासोलापूर

संबंधित बातम्या

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Next Post
मंगळवेढयातील जप्त १६१.८८ ब्रास वाळू साठ्याचा जाहीर लिलाव

प्रशासन कोरोना कामात व्यस्त तर मंगळवेढ्यात वाळू माफियांकडून अवैध वाळू उपसा सुरू; एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..