mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आईच्या कष्टाचे मुलीने केले सार्थक; मंगळवेढ्याची लेक चालली देशरक्षणासाठी सीमेवर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 8, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
आईच्या कष्टाचे मुलीने केले सार्थक; मंगळवेढ्याची लेक चालली देशरक्षणासाठी सीमेवर

टीम मंगळवेढा टाईम्स । 

मंगळवेढा तालुक्‍यातील बठाण गावातील स्नेहल भास्कर घोडके. गावची लोकसंख्या जेमतेम एक हजारच्या आसपास. शिक्षण घेतच तिने भारतीय सीमा सुरक्षा दलात यश संपादन केलं आहे.

सैन्य दलात रुजू होणारी ती गावातील पहिलीच मुलगी. आई उषा शिवणकाम करून कुटुंब चालवते. दोन मुली आणि एक मुलगा इतक्‍याच लहानशा कुटुंबाची जबाबदारी आई एकटी सांभाळतीय.

लहानपणापासून आर्मी जवानांना पाहून आपल्यालाही देशसेवा करायची आहे, हे स्वप्न तिने बाळगले. घरचे काम करत अन्‌ शिक्षण पूर्ण करत तिने हे यश मिळवले आहे.

मनापासून जिद्द ठेवली तर कितीही अडचणी आल्या तरी सारं काही मिळवू शकतो, हेच दाखवून तिने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. देशाचं रक्षण करण्यासाठी ती तयार झाली आहे.

स्नेहल पाचवीचे शिक्षण घेत असतानाच वडिलांचे छत्र हरपले. कुटुंबाचा डोलारा आणि आयुष्याची चालढकल करत आईचं कष्ट सुरू आहे.

आपण शिकून काहीतरी करून दाखवायचं, हीच जिद्द मनात ठेवून स्नेहलने जेमतेम परिस्थितीतही कमालच करून दाखवली.

अलीकडे शासकीय नोकरी मिळवणं कठीणच. पण, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तरुणाई मागे हटायला तयार नाही. स्नेहल या तरुणीवर तिच्या गावात कौतुकांचा वर्षाव होत आहे.

घोडके कुटुंबातील स्नेहल ही मोठी मुलगी. तिची लहान बहीण ऋतुजा बीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असून लहान भाऊ सोहम दहावीत आहे.

घरची तीन एकर बागायती शेती आहे पण ती शेती दुसऱ्यांना सांभाळायला दिली आहे. तिच्यातील शिक्षणाची गोडी बघून आईने तिला पुढे शिकवण्याचा निर्धार केला.

स्नेहलचे सातवीपर्यंतचे शिक्षण मंगळवेढ्यामध्ये झाले. पाचवीत असताना वडील गेल्यामुळे ती आणि तिचे कुटुंब दोन वर्षांनी पंढरपूरमध्ये राहायला गेले. सध्या पुढील शिक्षण पंढरपूरमध्ये करत आहे.

सध्या ती बीएस्सीच्या अंतिम वर्षात शिकत आहे. काम करत, शिक्षण घेत तिने अभ्यास केला. घरची परिस्थिती बदलण्यासाठी तिने भरतीचे स्वप्न मनात ठेवून कष्ट करायला सुरवात केली.

स्नेहलने दहावीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली. तिचे सख्खे मामा पीएसआय असल्यामुळे तिला त्यांच्याकडून अभ्यासाची खूप मदत मिळाली. सुरवातीला तिच्या मामाने तिला काही पुस्तके अभ्यास करण्यासाठी दिली.

तेव्हापासून तिला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मामांनी खूप मार्गदर्शन केले. आईची मदत आणि मामांचे मार्गदर्शन यामुळे साऱ्या गोष्टी सोप्या झाल्या. गावातील काहींचा तिला अभ्यास करण्यासाठी विरोध होता. मोठी मुलगी आहे, लवकर लग्न करून दिल्या घरी पाठवा असे बोलायचे. या साऱ्यांना तोंड देत आईने स्नेहलला शिकवले.

अशातच 2018-19 ला स्टाफ सिलेक्‍शन कमिशनमार्फत भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जागा निघाल्या. त्या वेळी तिने फॉर्म भरून अभ्यासाचे नियोजन करीत परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात ती भारतीय सीमा सुरक्षा दलात उत्तीर्ण झाली.

कोरोना महामारीमुळे या परीक्षेचा निकाल उशिरा लागला. म्हणजेच जानेवारी 2021 ला निकाल जाहीर झाला. आणि या परीक्षेत तिने यश संपादन केले. इतक्‍या लहानशा 21 वर्षांच्या स्नेहलने भारतीय सैन्य दलात यश मिळवले. स्नेहलचे पहिल्याच प्रयत्नात देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तिच्या या यशाचे तालुक्‍यात कौतुक होत आहे.

या यशाबाबत स्नेहल घोडके म्हणाली, लहानपणापासून आर्मी जवानांना पाहून आपणही देशसेवा करावी, हे जे स्वप्न पाहिलं ते मी पूर्ण केलंय. याचे सारे श्रेय माझ्या आईला जाते.

आईच्या कष्टाचे सार्थक झाले, याचा खूप आनंद होतो आहे. मला सैन्य दलात काम करण्याची संधी मिळतीय, त्याचा सदुपयोग करून इतर मुलींना प्रेरणा देईन. मनात जिद्द आणि कष्ट करण्याची चिकाटी असेल तर साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढासैन्य दलात भरतीस्नेहल घोडके

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 24, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सातबारा, दाखले अन् मोजणी अर्ज आता थेट हातात; सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत भव्य शिबिर; तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे?

July 23, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
Next Post
सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण; आज मंगळवेढ्यातील सराफ दुकाने सुरू असणार

महिला दिनी सोन्या-चांदीच्या दरात इतक्या' रुपयांची वाढ, पाहा काय आहेत दर

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 24, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सातबारा, दाखले अन् मोजणी अर्ज आता थेट हातात; सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत भव्य शिबिर; तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे?

July 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..