टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील 21 आणि पंढरपूर व अक्कलकोट येथील प्रत्येकी एक अशा एकूण 23 परीक्षा केंद्रावर आज रविवार, 13 सप्टेंबर रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ‘नीट’ परीक्षा पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचे नेटके आणि काटेकोर नियोजन करण्यात आल्याची माहिती परीक्षा समन्वयक प्रा.एस.डी. शिरगावे यांनी दिली. Of the National Testing Agency exam solapur
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या मार्फत वैद्यकीय प्रवेशासाठीची ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा आज रविवारी देशभरातील विविध केंद्रांवर पार पडत आहे.
सोलापूर शहरातील 21 आणि पंढरपूर, अक्कलकोट येथील प्रत्येकी एक अशा एकूण 23 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. एकूण 8 हजार 228 परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.
कोवीड -19 च्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना परीक्षार्थींना देण्यात आल्या आहेत. ‘एनटीए’ने दिलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी या परीक्षार्थींनी करावयाची आहे.
परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोचल्यावर त्यांचे मास्क काढून घेऊन त्यांना नवीन मास्क देण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेसाठी आपल्या पेपरच्या वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे प्रा.शिरगावे यांनी सांगितले.
नीट परीक्षेसाठी सर्व परीक्षा केंद्रांवर चोख नियोजन केले आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्क्रीनिंग होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी पोहोचावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना ताप व इतर लक्षणे दिसतील अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था केली असून, त्याठिकाणी ते परीक्षा देतील.
परीक्षेवेळी परीक्षार्थींमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी विशेष दक्षता घेऊन बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.-प्रा. एस. डी. शिरगावे, परीक्षा समन्वयक
‘हे’ आहेत सोलापुरातील परीक्षा केंद्रे
सिहंगड कॉलेज, सिहंगड पब्लीक स्कूल, व्हीव्हीपी पॉलिटेक्निक महाविद्यालय, सोनी कॉलेज, सिध्देश्वर वूमन्स कॉलेज, ए.जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, केएलई स्कूल, संगमेश्वर कॉलेज, बीएमआयटी कॉलेज, अण्णप्पा काडादी प्रशाला, ऑर्चिड स्कूल, डब्ल्यूआयटी, सुयश गुरूकुल, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, आयएमएस स्कूल, दमाणी हायस्कूल, अक्कलकोट, पंढरपूर येथील 23 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
‘Neet’ examination today at examination center in Pandharpur and Akkalkot including Solapur
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज