टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील 223 जागांमधील 37 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 186 जागेसाठी 464 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात शिल्लक राहिले तर आज 405 उमेदवारानी 421 अर्ज माघार घेतले.बिनरोध सदस्यात भोसे चे सर्वात जास्त 10 बिनविरोध झाले
मुढवी ग्रामपंचायतसाठी 9 अर्ज दाखल केल्यामुळे यापूर्वी बिनविरोध झाली. भोसे 10, सलगर बुद्रुक 1, हुलजंती 2, डोणज 1,घरनिकी 6, ममदाबाद शे. 1,तामदर्डी 5,अरळी 1,मल्लेवाडी 1 असे मिळून 37 उमेदवार बिनरोध झाले.
इतर गावातील उमेदवारांची मनधरणी करण्यात गाव पातळीवरील नेत्यांना तडजोड करण्यात अपयश आले.
ग्रामपंचायत निहाय पात्र उमेदवार पुढीलप्रमाणे मरवडे 35,,लमाण तांडा 22,तांडोर 14,सिध्दापूर 24, कर्जाळ- कात्राळ 15,आसबेवाडी 14,बोराळे 28,गणेशवाडी 15,डोणज 24,हुलजंती 26,महमदाबाद शे 13,
मल्लेवाडी 13,नंदेश्वर 34,लेंडवे चिंचाळे 21,लवंगी 27,अरळी 22,सलगर बु 24,माचणूर 20,तामदर्डी 9,मुढवी 9,घरनिकी 12, भोसे 23, कचरेवाडी 20 इतके अर्ज शिल्लक राहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज