टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथील सारिका अमोल भंडारे (वय २४) ही महिला सिझर होवून बाळंतपण करीत असताना उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.या घटनेची पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
या घटनेची हकिकत अशी रड्डे येथील सारिका भंडारे ही आठ महिन्याची गरोदर असताना तीला त्रास होवू लागल्याने उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दि.१४ रोजी सकाळी ६.३६ वा. तीची आई मंजुळा चव्हाण हिने दाखल केले होते.
दरम्यान, तीचे सिझर होवून बाळंतपणही झाले . तीची तब्येत बिघडल्याने दि. १५ रोजी २.१५ वा. उपचारादरम्यान ती मयत झाल्याची खबर सिव्हील येथील डॉ.वर्षा कांबळे यांनी पोलिसात दिली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक आवटे हे करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज