आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे…
साथ आठ व्हाट्सअप ग्रुप एडमिन आणि फेसबुक वर सतराशेसाठ मित्र आहे. !!
व्हाट्सअप वरचा “भावी सरपंच” स्टेटस ला तर भरपूर प्रतिसाद आहे.!!
जिंदगी मस्त चाललय भाऊ,
फक्त 300 मतांचा मेळ झाला पाहिजे .!!
!!आयुष्य खूप सुंदर आहे ,फक्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे. !!
वेळ आली तर जमीन विकणार,
विरोध केल्यास भावकी ही ठोकणार,
खूप प्रतिष्ठेची निवडणूक यंदा ,
साहेब सरपंच झालेच पाहिजे .
!!आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे. !!
दिवसा चहापाणी हॉटेलात आणि
रात्री धाब्यावर दारू मटण फुकट आहे !!
पण घरात अन्नाचा तुकडा नाही म्हणून ,
घराबाहेरचं कुत्र सुद्धा भुकत आहे. !!
तुमच्यासाठी साहेब, स्वतःचं रक्त सुद्धा सांडू,
पण पॅनल आपलं च बसलं पाहिजे. !!
!!आयुष्य खूप सुंदर आहे ,फक्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे. !!
वाईट वाटून घेऊ नका साहेब.
पण यंदा मनात आहे एक खंत .!!
कारण गेल्या वेळी ज्यांच्या साठी चार महिने होतो आत,
आज युतीमुळे आहेत तेच तुमचे निष्ठावंत !!
किती दिवस कार्यकर्ता म्हणून राबणार,
यंदा मला पण तिकीट दिलेच पाहिजे. !!
!! आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे !!
एक तर” आपला” नाहीतर “विरोधक” असे माणसांचे दोनच प्रकार गावात आज आहे.
निवडणुकीच्या या बाजारात “माणूस”च कवडीमोलाने भावाने विकला गेलेला आहे !!
कळकळीची विनंती करतो गाव कारभाऱ्यांना,
खरंच विकासाच म्हणताय तर ग्रामपंचायत बिनविरोधच झाली पाहिजे. !!
!!आयुष्य खूप सुंदर आहे ,फक्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे !!
!!आयुष्य खूप सुंदर आहे ,फक्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे !!
डाॅं. अतुल निकम. मरवडे,9923076911
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज