mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! मंगळवेढ्यातील तरुणाचा दारूच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 11, 2020
in क्राईम
धक्कादायक! मंगळवेढ्यातील तरुणाचा दारूच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न

मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव येथे दारूच्या नशेत चंद्रकांत भोजलिंग मोरे (वय 35) या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मोरे यास त्रास होऊ लागल्यावर त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

हिप्परगा ब्रीजवर अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

सोलापूर ते तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा ब्रीजजवळ रांगोळी कारखान्याजवळ पायी जाणाऱ्या विकास नागनाथ बाबरे (वय 31, रा. वावरे वस्ती, लक्ष्मी मंदिर, बेलाटी) यास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हा अपघात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. जखमी अवस्थेत विकास बाबरे यास जोडभावी पेठ पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांस डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

डोणगाव येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील डोणगाव येथे हरिदास जालींदर गायकवाड (वय 75) या वृद्धाने परमेश्‍वर आमले यांच्या शेतात लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर गावातील लोकांनी गायकवाड यांना खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.

पूर्व वैमनस्यातून दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुळेगाव तांडा येथे राजू शिवाजी राठोड (वय 29) आणि कस्तुराबाई शिवाजी राठोड (वय 42) या दोघांना अर्जुन जाधव, कुमार जाधव, प्रकाश जाधव, ध्रुवपती जाधव, शुषाबाई राठोड यांनी लाथाबुक्‍क्‍याने व तलवारीने मारून जखमी केले.

दोघांनाही जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.

वडगावच्या विहिरीत आढळला वृद्धेचा मृतदेह

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील धोत्रीजवळील वडगाव येथील सोमशेखर कोडगे यांच्या शेतातील विहिरीत शकुंतला निंगप्पा गायकवाड (वय 60) या वृद्ध महिलेचा मृतदेह गुरुवारी सकाळी मिळून आला.

पांडुरंग गायकवाड यांनी शकुंतला यांचा मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

घरगुती कारणावरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

घरात झालेल्या तक्रारीमुळे सुग्रीव महादेव चौधरी (वय 25, रा. नरखेड, ता. मोहोळ) या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुग्रीव यास त्रास होऊ लागल्यावर त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस स्टेशनसोलापूर

संबंधित बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 17, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 11, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
Next Post
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

September 29, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा