समाधान फुगारे । 7588214814
मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्समध्ये खास लग्नसराई निमित्ताने नवरीच्या संपूर्ण अलंकार खरेदीवर पैठणी मोफत तर नवरदेवाच्या अलंकार खरेदीवर आकर्षक भेटवस्तू दिली जाणार असल्याची माहिती संचालक जयदीप रत्नपारखी यांनी दिली.
ग्राहकहितालाच सर्वप्रथम प्राधान्य देणारी सुवर्णपेढी अर्थात मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांनी खास लग्नसराईचे औचित्य साधून एका अभिनव योजनेचा शुभारंभ केला आहे.
या योजनेअंतर्गत नवरीसाठी व नवरदेवासाठी संपूर्ण अलंकाराची विविध व्हरायटी एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर नवरीचे सर्व अलंकार खरेदी केल्यानंतर मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स मार्फत पैठणी दिली जाणार आहे.
ग्राहकाभिमुख असलेला हा व्यवसाय आणखी एक पाऊल पुढे टाकत सोने दागिन्यांच्या खरेदीवर त्या दगिन्यांना विमा संरक्षण करून देत आहे हि सुविधा मोफत आहे.
सध्याच्या असुरक्षित जीवनशैलीमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नेहमीच त्या दागिन्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटत असते. म्हणून ग्राहकहिताच्या दृष्टीने ही योजना सुरू केली आहे.
स्मार्ट महाबचत योजने अंतर्गत विनामजुरीचे सोने आता ग्राहकांना खरेदीकरता येणार आहे.त्यासोबत खरेदी केलेल्या दागिन्यांचा मोफत विमा उतरवला जाणार आहे.
“हौस तुमची जबाबदारी आमची’ या मूलतत्त्वांच्या आधारावर सर्वांना सुरक्षिततेची हमी देत फ्री इन्शुरन्स या योजनेचे स्वागत केले जात आहे.
दागिने खरेदी करणे म्हणजे एक उत्तम गुंतवणूक असते. या गुंतवणुकीसोबतच येते ती दागिने संभाळण्याची जबाबदारी. परंतु मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांच्या मोफत विमा संरक्षण योजनेमुळे आता फक्त दागिने खरेदी करायचे आणि बिनधास्त राहायचे.
तसेच खास लग्नसराई निमित्ताने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांच्या शाखेला भेट देण्याचे आवाहन संचालक जयदीप रत्नपारखी यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज