टीम मंगळवेढा टाईम्स । सहा महिन्याच्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तीची आई सोनाली गोडसे विरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.७ सप्टेंबर रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सोनाली सिध्देश्वर गोडसे (वय २२ रा.धर्मगाव) या महिलेने विहिरीतील पाण्यात पडल्यानंतर मृत्यू होवू शकतो,
हे माहित असतानाही मुलगी जिजा उर्फ पिल्लू सिध्देश्वर गोडसे ( वय ६ महिने ) व कृष्णा सिध्देश्वर गोडसे ( वय २ वर्षे ) यांना घेवून शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
कृष्णा याच्या जीवीतास धोका होईल असे कृत्य करून जिजा उर्फ पिल्लू हिच्या मरणास ती कारणीभूत झाली.
याची फिर्याद पो.ना.अमर सुरवसे यांनी मंगळवेढा पोलिसात दिली असून सोनाली गोडसेविरूध्द भा.दं.वि.सं.कलम ३०४ (२) , ३०८,३०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरिक्षक ज्योतिराम गुंजवटे हे करीत आहेत.
Mangalwedha dharmgav A case has been registered against the mother for causing the death of her daughter
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज