mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांना दिलासा! मंगळवेढा तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत निधी जमा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 18, 2020
in मंगळवेढा
शेतकऱ्यांना दिलासा! मंगळवेढा तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत निधी जमा

अतिवृष्टीच्या नुकसानीचा निधी आल्यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा व्हावा यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिवाळी सुट्टी रद्द केल्या.

मात्र बँकांच्या सलग तीन दिवस सुट्ट्यामुळे अडकून पडलेला निधी अखेर मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील तब्बल ३६ हजार शेतकऱ्यांना १९ कोटी ९८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

मंगळवारी पाच वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत असल्याचे मेसेज मोबाईलवर पाहून शेतकरी आनंदित होत आहेत.

मंगळवेढा तालुक्यात भिमा नदीला आलेला महापूर व झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी १९ कोटी ९८ लाख ६४ हजार इतके अनुदान प्राप्त झाले. हे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने केली.

या दरम्यान तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलचे कर्मचारी यांनी खूप मोठे परिश्रम घेतले मात्र सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने हा निधी असुनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता.

ऑक्टोबर महिन्यात दि. १३ ते २० या दरम्यान भिमा नदीला महापूर आला होता. अतिवृष्टी व महापूराने भीमा व माण नदीकाठसह तालुक्यातील ८१ गावातील विविध पिकांना मोठा फटका बसला होता.

काळया शिवारात रब्बी ज्वारी, हरभरा, सुर्यफूल, तुरी, कांदा, कडधान्य यासह ऊस , फळपिके यांचे अतीवृष्टी झाल्याने नुकसान झाल्याने शासनाच्या आदेशाप्रमाणे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाने पाहणी करून नुकसानीचा अहवाल महसूल प्रशासनास सादर केला होता.

यामध्ये नुकसानीपोटी मंगळवेढा महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे३४ कोटी ७६ लाख ७९ हजार ८२२ ची गरज असल्याचे कळविले होते. मात्र प्रत्यक्षात २० कोटी ९६ लाख ६४ हजार इतके अनुदान प्राप्त झाले होते.

या आकडेवारीनूसार प्रति हेक्टर जिरायत बागायत दहा हजार रुपये तर फळबागांसाठी प्रती हेक्टर २५ हजार रुपये नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांना दिवाळीत मदत निधी मिळावा यासाठी तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व तलाठी , मंडल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी मोठे परिश्रम घेतले आहे.(लोकमत)

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील ८१ गावातील ३६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १९ कोटी ९८ लाख रुपये जमा करण्यात आला आहे .मंगळवारपासून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे- स्वप्निल रावडे, तहसीलदार मंगळवेढा

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा ठरवून शेतकऱ्यांना दिलासा दिला . आज माझ्या बँक खात्यात रक्कम जमा झाली.गतवर्षी ही महापुराने भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे केले मात्र मदत मिळाली नाही तरी गतवर्षीच्या मदत निधीचे अशाप्रकारे लवकर वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा- माणिकबाबा पाटील, शेतकरी ब्रह्मपुरी

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनुदानबँकशेतकरी

संबंधित बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

​​ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन

September 8, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
Next Post
वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क झाले गायब, निम्मा महाराष्ट्र झाला नाॅट रिचेबल

सावधान! कोरोना व्हायरसमुळे मोबाईल फोनला सॅनिटायझरचा वापर करताय होईल तोटा; जाणून घ्या

ताज्या बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..