mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर तिघांनी केला सामूहिक अत्याचार; मुलगी कोमात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 21, 2020
in क्राईम, राज्य

महाराष्ट्राला लाजीरवाणी अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एका गावात घडली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून मंगळवारी रात्री उशीरा तीन अल्पवयीन मुलांविरूध्द पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पीडितेची प्रकृती गंभीर असून ती कोमात असल्याची चर्चा आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१८ ऑक्टोबर रोजी गावातीलच तीन मुलांनी दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला होता.

अत्याचार झाल्याबाबत मुलीने घरी सांगितले नव्हते. दुसऱ्या दिवशी सोमवारी मुलीची प्रकृती खालवल्याने तिच्या पालकांनी तिला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी तिच्या आई, वडिलांनी उलट्या, जुलाब होत असल्याचे सांगितले होते.

परंतु डॉक्टरांना अत्याचार झाल्याचा संशय आला. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर महिला सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासोबत पीडित मुलीला पुढील उपचार व तपासणीसाठी लातूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटना घडून तीन दिवस झाले होते. परंतु पीडितेचे नातेवाईक फिर्याद देण्यासाठी पुढे आले नसल्याने पोलिसांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली होती. अखेर पीडिताच्या वडिलांनी मंगळवारी रात्री उशीरा लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावरुन तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीवर लातूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला सामूहिक अत्याचाराचा मानसिक धक्का बसला आहे. तिची प्रकृती गंभीर असून ती सध्या कोमात आहे.


या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर मुले अल्पवयीन असून १४ ते पंधरा वयोगटातील आहेत. अत्याचार करणारे चौघे जण असल्याचे सांगितले जात आहे. परंतु पीडित मुलगी शुध्दीवर आल्यावरचं नेमका काय प्रकार व किती जणांनी अत्याचार केला ते स्पष्ट होणार आहे. सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पोलिस प्रशासनाने तपासाला गती दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलिस पथक गावात दाखल झाले असून कसून तपास करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उस्मानाबाद अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 10, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
Next Post
गाडीला चॉईस नंबर हवा आहे, मग ‘हे’ काम करा; सोलापूर जिल्हा आर.टी.ओ चे आवाहन

गाडीला चॉईस नंबर हवा आहे, मग 'हे' काम करा; सोलापूर जिल्हा आर.टी.ओ चे आवाहन

ताज्या बातम्या

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 11, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

August 11, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढा पोलिसांना संभाजी ब्रिगेडचे थेट आव्हान; अवैध धंदे रोखा, नाहीतर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

August 11, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा