सोलापूर जिल्ह्यातील वाहन धारकांना पसंतीचे नंबर घेण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा आता संपली असून आपल्या आवडीचा चॉईस नंबर निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात चारचाकी वाहनाकरिताची MH-13-DQ ही मालिका सुरू होणार असून पसंतीच्या आणि आकर्षक क्रमांकासाठी राष्ट्रीयकृत बँकेचा मागणी धनाकर्ष (डीडी) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी केले आहे.
ग्राहकांनी डेप्युटी आरटीओ, सोलापूर यांच्या नावे डीडी काढून परिहन कार्यालयातील लिपीक एस.ए. बेळ्ळे यांच्याकडे 22 ऑक्टोबर 2020 च्या दुपारी 3 वाजेपर्यंत जमा करावेत.
एकाच आकर्षक क्रमांकासाठी जास्त मागणी अर्ज आले तर त्याचा लिलाव करून क्रमांक देण्यात येणार असल्याचे संजय डोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज