mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील ‘या’ गावात रेशन दुकानातील धान्यवाटपाच्या कारणावरून दोन गटात दंगल, ऍट्रॉसिटी व विनयभंगाचे गुन्हे दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात रेशन दुकानातील धान्यवाटपाच्या कारणावरून दोन गटात दंगल, ऍट्रॉसिटी व विनयभंगाचे गुन्हे दाखल

 

रड्डे । मं.टा. टीम शिरनांदगी (ता. मंगळवेढा) येथे स्वस्त धान्य दुकानातील माल वाटपाच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. यातून परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीवरून 16 जणांवर ऍट्रॉसिटी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील स्वस्त धान्य दुकानातील मालाचे वितरण व्यवस्थित होत नसल्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपूर्वी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती.

या तक्रार अर्जामध्ये, हे दुकान गावातील एका बचत गटाला दिल्यास तो धान्याचे वाटप व्यवस्थित करेल, असे नमूद केले. ही तक्रार राजकीय हेतूने केल्याची भावना दुसऱ्या गटाची निर्माण झाली.

दरम्यान, तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदारांनी चौकशी करण्यासाठी घटनास्थळी सकाळी 10 वाजता हजर राहण्यास फिर्यादी व तक्रारदारास सांगितले.

त्या वेळी धान्याची पोती उतरवत असताना पहिल्या घटनेतील 50 वर्षीय फिर्यादीचा मुलगा देविदास व आकाश खांडेकर यांनी मोबाईलमध्ये माल उतरवतानाचे व्हिडीओ चित्रीकरण करताना रेशन दुकानदार सुनील कांबळे याने जातिवाचक शिवीगाळ करून, तुमचे इथे काय काम आहे, असे म्हणत फिर्यादीच्या वस्त्राची ओडाओढ केली.


या झटापटीत फिर्यादीचे मंगळसूत्र गळून पडले व फिर्यादीचा नवरा मध्ये पडल्यावर त्यालाही सुनील कांबळे याने मारहाण केली तसेच मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.

या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार सुनील कांबळे, प्रकाश किसवे, अंकुश किसवे, महादेव खताळ, सचिन खांडेकर, बाबूराव थोरबोले, महेश मासाळ, परमेश्वर खांडेकर, गणेश कांबळे, विठ्ठल पाटील, यशवंत कांबळे (सर्वजण रा. शिरनांदगी) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक व विनयभंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्याकडे देण्यात आला.


दुसऱ्या घटनेची फिर्याद 23 वर्षीय महिलेने दिली असून त्यात म्हटले, की नारायण खांडेकर, आकाश खांडेकर, बाळाबाई गायकवाड, गजानन गायकवाड, देविदास गायकवाड हे मोटरसायकलवरून फिर्यादीच्या घरासमोर आले.

तुमचे रेशन दुकान बंद करावयाचे आहे, तुम्ही आम्हाला माल व्यवस्थित देत नाही असे म्हणत फिर्यादीच्या पतीस दमदाटी व शिवीगाळ करू लागले. त्यामुळे या वादात कोणीतरी मारेल या भीतीपोटी फिर्यादी मध्ये पडली असता फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली.

एकूणात स्वस्त धान्य दुकानातील वाद व धान्य वाटपावरून सुरू झालेला वाद ऍट्रासिटी व विनयभंगा पर्यंत येऊन पोचला आहे.

Mangalwedha shiranandagi Riot in two groups over distribution of foodgrains in ration shops,Atrocities and molestation cases filed

???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 557 नव्या कोरोनाबाधितांची भर, 12 जणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 557 नव्या कोरोनाबाधितांची भर, 12 जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! शेव करताना गॅसचा स्फोट, २ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई वडिलांसह ४ गंभीर जखमी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

June 26, 2025
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच आता लवकरच महागड्या वीजेपासून होणार सुटका; कोणाला होणार फायदा?

June 26, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा