मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरासह जवळपासची खेडी व इतर काही तालुक्यात गुरुवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास गूढ आवाजाने हादरली. भयभीत नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
मंगळवेढा तालुक्यात गूढ आवाज नवे नाहीत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून असे आवाज होणे बंद झाले होते.हाच आवाज गेली वर्षी १२ नोव्हेंबर रोजी व चालू वर्षीही आला होता.
आज सकाळी मंगळवेढा शहर आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दैनंदिनं काम सुरू झाली आणि साधारण १०.१५ मिनिटांनी अचानक झालेल्या गूढ आवाजाने मंगळवेढा तालुका हादरला. मंगळवेढा शहरासह जवळपासची खेडी ही या आवाजाने हादरून गेली, खिडक्यांच्या काचाचा थरकाप प्रकर्षाने जाणवला. काय झाले या भीतीने प्रत्येकजण घरा बाहेर पडत होते, नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी एकमेकांना संपर्क करू लागले. मात्र कुणाकडेच याची माहिती मिळत नव्हती.
गेल्या दोन तीन वर्षांपासून अधूनमधून असे गूढ आवाज येण्याच्या घटना सुरू आहेत.
काही ठिकाणी हादऱ्याने घड्याळं, भांडी, कपाटं खाली पडली तर खिडक्या, दरवाज्यांचा देखील झटक्याने आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले. गूढ आवाज होऊन जोरदार झटका बसल्याने भूकंप झाल्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले. या गूढ आवाजाने नागरिकांच्या मनात घर केले आहे.गूढ आवाजाने जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या गूढ आवाजाची अद्याप पर्यंत प्रशासनाकडे कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज