टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 357 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामध्ये एकाच दिवशी मंगळवेढा तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद आज आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालात नोंद आहे.
आज 2 हजार 780 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 423 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 357 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 231 पुरुष तर 126 महिला आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या 21 हजार 713 एवढी झाली आहे. त्यामध्ये 13 हजार 394 पुरुष तर आठ हजार 319 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 602 जणांचा बळी गेला आहे.
कोरोनामुळेबाधित झालेल्या सहा हजार 940 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.कोरोनामुक्त होऊन 14 हजार 171 जण सुखरुप घरी पोचले आहेत.
आज ‘या’ गावात पंधरा जणांचा मृत्यू
मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव येथील 71 वर्षाचे पुरुष, बोराळे येथील 64 वर्षांचे पुरुष,भोसे येथील 53 वर्षाचे पुरुषाचा कोरोना मृत्यू झाला आहे.
सांगोला तालुक्यातील भोईटे वस्ती येथील 40 वर्षाचे पुरुष, कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 42 वर्षाचे पुरुष, भुताष्टे (ता. माढा) येथील 65 वर्षाचे पुरुष, लोंढेवाडी (ता. माढा) येथील 57 वर्षाचे पुरुष, उंबरे दहिगाव (ता. माळशिरस) येथील 77 वर्षाचे पुरुष, वेळापूर (ता. माळशिरस) येथील 77 वर्षाचे पुरुष, बोरगाव देशमुख (ता. अक्कलकोट) येथील 85 वर्षाची महिला, नंदूर (ता. उत्तर सोलापूर) येथील 80 वर्षांचे पुरुष,
तर नातेपुते (ता. माळशिरस) येथील 52 वर्षाची महिला, शिवणी (ता. उत्तर सोलापूर) 60 वर्षाचे पुरुष, तांदुळवाडी (ता. माढा) येथील 61 वर्षाचे पुरुष तर राऊत चाळ बार्शी येथील 83 वर्षाच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या (कंसात मृत्यू)
मंगळवेढा 1005 (21),सांगोला 1503 (20),पंढरपूर 4307 (104),बार्शी 4044 (139),माळशिरस 3379 (65),माढा 2174 (68),द. सोलापूर 1201 (27),करमाळा 1670 (33),अक्कलकोट 845 (56),मोहोळ 937 (40),उ. सोलापूर 648 (29), एकूण 21 हजार 713 (602)
Solapur rural corona 357 new patients in rural Solapur and died three in Mangalvedha taluka
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज