mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

निर्भया प्रकरण : नराधमांची फाशी लांबणीवर?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
निर्भया प्रकरण : नराधमांची फाशी लांबणीवर?

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणातील चारपैकी एका दोषीने डेथ वॉरंटविरोधात सादर केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज सुनावणी घेण्यास नकार देत संबंधित दोषीला सत्र न्यायालयामध्ये धाव घेण्याची मुभा दिली, यामुळे आता अन्य तीन नराधमांची फाशीची शिक्षा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

न्या. मनमोहन आणि न्या. संगीता धिंग्रा सेहगल यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणाची सुनावणी झाली. सत्र न्यायालयाने याआधी ७ जानेवारी रोजी दोषी मुकेशकुमार सिंह याच्याविरोधात डेथ वॉरंट बजावण्याचा निर्णय घेतला होता, कनिष्ठ न्यायालयाच्या या निकालामध्ये काहीही चूक नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आजच्या सुनावणी वेळी दिल्ली सरकारने उच्च न्यायालयास सांगितले की, ”या सर्व नराधमांना २२ जानेवारी रोजी फाशी देणे शक्‍य होणार नाही; कारण त्यातील एकाने दया याचिका सादर केली आहे.” तत्पूर्वी दिल्ली न्यायालयाने सात जानेवारी रोजी मुकेश (वय ३२), विनय शर्मा (वय २६), अक्षय सिंह (वय ३१) आणि पवन गुप्ता (वय २५) या चौघांविरोधात डेथ वॉरंट बजावले होते. तसेच या सर्वांना शिक्षा देण्याचेही ठरले होते. या संदर्भात दोषी मुकेशच्या वकिलांनी सांगितले की, ”आम्ही आता सत्र न्यायालयामध्ये धाव घेणार आहोत, उच्च न्यायालयानेच या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार देताना याबाबत आम्हाला सत्र किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची मुभा दिली आहे.” तत्पूर्वी आज दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी मुकेशच्या याचिकेवर सुनावणी घेताना त्याने डेथ वॉरंटला दिलेले आव्हान हे अपरिपक्वपणाचे असल्याचे सांगितले.

दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी न्यायालयास सांगितले की, ”आता यातील एका दोषीने दया याचिका सादर केली असल्याने अन्य तिघांच्या शिक्षेवर अंमलबजावणी होऊ शकत नाही. तुरुंग नियमांनुसार तसे करणे बंधनकारक आहे. मुकेशप्रमाणे त्याचे अन्य सहकारीदेखील तोच मार्ग अवलंबिणार का हे पाहणेदेखील गरजेचे आहे.” यावर न्यायालय म्हणाले की, ”आता सर्व दोषी दया याचिका सादर करत नाही तोवर तुम्हाला कारवाई करता येणार नसेल, तर तुमचे नियम वाईट आहेत. येथे अर्जाचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. सगळ्या व्यवस्थेलाच कर्करोग झाला आहे.” यावर तुरुंग प्रशासनाचा बचाव करताना मेहरा म्हणाले की, ”दोषी हे सध्या नैराश्‍यात असून, त्यामुळेच ते शिक्षेची अंमलबजावणी होऊ नये म्हणून दया याचिका आणि अन्य कायदेशीर मार्गांचा आधार घेत आहेत. या सर्व दोषींच्या शिक्षेसाठी २२ जानेवारी ही तारीख नियमानुसार ठरविण्यात आली होती. आता या दोषीच्या दयायाचिकेवर २१ जानेवारी दुपारपर्यंत निर्णय घेण्यात आला नाही, तर तुरुंग प्रशासनाला नव्याने डेथ वॉरंटसाठी सत्र न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागेल. २२ जानेवारीच्या आधी किंवा नंतर दयायाचिका फेटाळून लावण्यात आली तरीसुद्धा सत्र न्यायालयाकडून पुन्हा डेथ वॉरंट मिळवावे लागेल.”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
नैताळेच्या यात्रेत बालिकेचे अपहरण करत अत्याचार

नैताळेच्या यात्रेत बालिकेचे अपहरण करत अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर जिल्हा हादरला

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! सुसाट कंटेनरने हिरावले दोन तरुण प्राण; गावावर शोककळा, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची रुग्णालयात प्राणज्योत मालवली

April 5, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

April 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा