mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरातील २१ साखर कारखान्याकडून २५ लाख साखर पोत्यांची निर्मिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूरातील २१ साखर कारखान्याकडून २५ लाख साखर पोत्यांची निर्मिती


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सोलापूर जिल्ह्यातील  21 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 28 लाख 48 हजार 576 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यातून 25 लाख 57 हजार 928 साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्या क्षमतेनेच कारखाने सुरू आहेत. त्यामुळे साखर उत्पादनात कमालीची घट झाली आहे.

जाहिरातीसाठी संपर्क: 7588214814


यंदाच्या गळीत हंगामात 33 साखर कारखान्यांपैकी केवळ 21 साखर कारखान्यांनी आपला बॉयलर पेटवला आहे, तर तब्बल 12 साखर कारखानदारांनी उसाची वाईट स्थिती पाहून कारखाने बंद ठेवणे पसंत केले आहे. जे कारखाने सुरू आहेत, त्यातील बोटावर मोजण्याइतपत कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.बहुसंख्य कारखान्यांत 50 टक्क्यांपेक्षा कमी क्षमतेने ऊस गाळप सुरू आहे.

गाळप क्षमतेत माढ्यातील विठ्ठलराव शिंदे हा साखर कारखाना पुढे आहे, तर संत दामाजी साखर कारखान्याची गाळप क्षमता सर्वात कमी आहे. सिध्देश्वर साखर कारखाना 1 लाख 4 हजार मेट्रिक टन, सहकारमहर्षी अकलूज 3 लाख 2 हजार मेट्रिक टन, पांडुरंग श्रीपूर 2 लाख 56 हजार मेट्रिक टन, संत दामाजी मंगळवेढा 35 हजार, विठ्ठलराव शिंदे माढा 4 लाख 89 हजार, सासवड माळी माळीनगर 1 लाख 63 हजार, विठ्ठल शुगर म्हैसगाव 77 हजार मेट्रिक टन, जकराया वटवटे 1 लाख 47 हजार मेट्रिक टन, भैरवनाथ शुगर विहाळ 43 हजार मेट्रिक टन, फॅबटेक शुगर बालाजीनगर 64 हजार मेट्रिक टन, भैरवनाथ शुगर लवंगी 56 हजार मेट्रिक टन, युटोपियन शुगर 1 लाख 74 हजार, जयहिंद शुगर आचेगाव 1 लाख 58 हजार मेट्रिक टन, विठ्ठलसाई मुरूम 1 लाख 1 हजार मेट्रिक टन, कंचेश्वर मंगरूळ 53 हजार मेट्रिक टन असे एकूण 22 लाख 30 हजार 103 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. 19 लाख 59 हजार 274 हजार साखरेच्या पोत्यांचे उत्पादन झाले आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यात केवळ 38 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे उसाच्या लागवडीत घट झाली होती. याचवेळी हुमणीनेही उसाला ग्रासले होते. त्यातच ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका दुष्काळातून तरलेल्या उसाला बसला. याचा एकत्रित परिणाम म्हणून यंदाच्या वर्षी उसाच्या उत्पादनात कमालीची घट झाली. त्यामुळे गाळपासाठी ऊस आणायचा कुठून, असा प्रश्न साखर कारखान्यांसमोर उभा राहिला आहे. धाडस करत ज्या कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे, त्या कारखान्यांकडून ऊस मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना उसाचे अ‍ॅडव्हान्स पेमेंट दिले जाऊ लागले आहे. तरीही ऊस मिळणे अवघड झाले आहे.

पूर्ण क्षमतेने कारखाना चालत नसल्यामुळे कारखानदारांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. बँकेचे हप्ते आणि कामगारांची पगारापोटीची देणी कशी द्यायची, त्याचबरोबर कोट्यवधींच्या कर्जाची परतफेड कशी करायची, याची चिंता कारखानदारांना सतावू लागली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
ठाकरे सरकार तरी देईल काय मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागाला न्याय?

ठाकरे सरकार तरी देईल काय मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागाला न्याय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा