mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking : सोलापुरात रात्रीत वाढले 26 नवे बाधित रुग्ण ; एकाचा बळी,संख्या 891 वर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
Breaking : सोलापुरात रात्रीत वाढले 26 नवे बाधित रुग्ण ; एकाचा बळी,संख्या 891 वर
ADVERTISEMENT

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी साडेसात ते आज रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 12 तासांमध्ये तब्बल नवीन 26 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून एका पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. (Solapur)

आज सकाळी आठ वाजेपर्यंत नव्याने आढळलेल्या 26 व्यक्तींमध्ये 13 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत 79 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 26 पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापुरात आतापर्यंत कोरोनामुळे 84 जणांचा मृत्यू झाला असून 380 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील 7 हजार 115 व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून 6 हजार 224 एवढे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सोलापुरातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 891 झाली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात येणार कसा? हा प्रश्न सर्वांसमोर पडला असून सोलापूर शहरातील कोरोना आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाऊ लागला आहे. अक्कलकोट, बार्शी, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळू लागल्याने सोलापुरातील कोरोनाबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

Solapur Corona updated Sunday 891 

—————————-

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Join WhatsApp Group for Latest News

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

सोलापूर-पुणे रोडवर अपघात; कंटेनरच्या धडकेत मंगळवेढा व पंढरपूर येथील युवकांचा मृत्यू

सोलापूर-पुणे रोडवर अपघात; कंटेनरच्या धडकेत मंगळवेढा व पंढरपूर येथील युवकांचा मृत्यू

November 9, 2020

पावसाचा तडाखा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात; असा असेल दौरा

October 19, 2020
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

Breaking : मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा तेत्तीसावा बळी; आज 13 जण कोरोनामुक्त

October 16, 2020
ठाकरे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ चार महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्रातील संपूर्ण अनलॉक कधी हटणार? उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, वाचा सविस्तर

October 12, 2020
ठाकरे सरकारच्या येत्या काही दिवसात ‘या’ तीन विकेट पडणार, भाजप नेत्याचा दावा

ठाकरे सरकारच्या येत्या काही दिवसात ‘या’ तीन विकेट पडणार, भाजप नेत्याचा दावा

October 11, 2020
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

October 12, 2020
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल! खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

October 12, 2020
पंतप्रधान मोदी आज लाँच करणार ‘संपत्ती कार्ड’; लाखो गावकऱ्यांना फायदा, महाराष्ट्रातल्या 100 गावांचा समावेश

पंतप्रधान मोदी आज लाँच करणार ‘संपत्ती कार्ड’; लाखो गावकऱ्यांना फायदा, महाराष्ट्रातल्या 100 गावांचा समावेश

October 11, 2020
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

October 12, 2020
Next Post
करोनाच्या भितीने सोलापूरच्या उपमहापौराला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले

करोनाच्या भितीने सोलापूरच्या उपमहापौराला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

मंगळवेढा ब्रेकिंग! ‘या’ मतदान केंद्रावर होमगार्डला मारले, तालुक्यात ७९.५९ टक्के मतदान

January 16, 2021
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ५वी ८वीचे वर्ग ‘या’ तारखेपासून सुरू होणार

January 16, 2021
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा ब्रेकिंग! नंदेश्वरला उमेदवारावर खुनी हल्ला, माजी उपसभापतीसह नऊजणांवर गुन्हा दाखल

January 16, 2021
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ ग्रामपंचायत उमेदवाराचा मतदानादिवशीच मृत्यू

January 15, 2021
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

अवैध दारू विक्री, पाचजण ताब्यात: २० हजारांचा साठा जप्त

January 15, 2021
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

मंगळवेढ्यात वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या पाहुण्यांच्या घरातून १० तोळे सोने चोरीला

January 15, 2021
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

Join WhatsApp Group for Latest News