टीम मंगळवेढा टाईम्स । एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेच्या उपमहापौराला सांगवी पोलिसांनी शुक्रवारी (ता. २९) रात्री सोलापूरहून ताब्यात घेऊन सांगवीत आणले. मात्र, शनिवारी (ता. 30) सांयकाळी ताप आणि शिंका आल्याने उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन त्यांना सोडले. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पोलिसांकडून अटक केल्याचे सांगितले जात असताना शनिवारी सायंकाळी अचानक उपमहापौरांना सोडण्याची सांगवी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. (Solapur deputy mayor the police and released rajesh kale)
राजेश दिलीप काळे (वय ३०, रा. सोलापूर) असे समजपत्र देऊन सोडलेल्या भाजपच्या उपमहापौराचे नाव आहे. याप्रकरणी सिंधू सुभाष चव्हाण (रा.कोंढवा) यांनी फिर्याद दिलेली आहे.
काळे हे सोलापूरचे उपमहापौर आहेत. फसवणुकीचा हा प्रकार 2005 ते 08 या कालावधीत घडला. काळे यांनी 2002 मध्ये पिंपळे-निलख येथील औंदूंबर सोसायटीत फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला. याप्रकरणी काळे यांच्या विरोधात 4 मे 2019 ला सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, सांगवी ठाण्यातील उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, पोलीस शिपाई दत्तात्रय नांगरे, संतोष डामसे यांचे पथक शुक्रवारी (दि. 29) विजापूर नाका पोलिस ठाण्यात गेले.
काळे यांना ताब्यात घेऊन हे पथक रात्री शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शनिवारी देखील सायंकाळी सातपर्यंत काळे यांना अटक केल्याचे सांगितले जात होते. मात्र, शनिवार सायंकाळी अचानक काळे यांना शिंका येऊ लागल्या. सध्या कोरोनाची साथ असल्याने काळे यांना उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे पोलिस अधिकारी सांगू लागले. ताप आणि शिंका असल्याने पोलिसांनी काळे यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, असे असताना उपमहापौर काळे यांना सोडण्याची सांगवी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.
या फसवणूक प्रकरणात उपमहापौर काळे यांना ताब्यात घेतले होते. शनिवारी दिवसभर सांगवी पोलिस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, सायंकाळी अचानक त्यांना शिंका येऊ लागल्या. सध्या कोरोनाची साथ असल्याने काळे यांना उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन नातेवाइकांसमवेत सोडण्यात आले. आठ दिवसांनी त्यांना पुन्हा पोलिस ठाण्यात हजर राहण्यास बजावण्यात आले आहे.– ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे
या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. या बाबतचे आदेश पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांना देण्यात आले आहेत.– रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
Fearing for his life the deputy mayor rajesh Kale of Solapur was questioned by the police and released

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज