टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरी विषारी औषध पिले होते. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे. याप्रकरणी मयत मुलीचे चुलते ज्ञानेश्वर पुजारी यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथील कु.संगिता महासिध्द पुजारी (वय 17)
हीने नजरचुकीने घरात ठेवलेले टु-फोरडी नावाचे विषारी औषध पिल्याने तिला उपचारासाठी महिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
फिर्यादीची पुतणी संगिता पुजारी हिच्यावर उपचार चालू असताना ती मयत झाली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज