टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला असून सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत.आज सोमवारी 152 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण बाधितांची संख्या 2 हजार 972 वर गेली आहे. Solapur rural On Monday again 152 patients were killed, seven died, the number reached 2972
1 हजार 352 व्यक्तींची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 152 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने आता जिल्ह्यातील नागरिक चिंतेत आहेत.
‘या’ तालुक्यात सापडले रुग्ण
मंगळवेढ्यातील बावची, फॅबटेक कारखाना कॉलनी, कात्राळ येथे प्रत्येकी तीन, मुंडवीत चार, मोहोळमधील आष्टे, खंडाळी, कोरवली, लांबोटी, नरखेड येथे प्रत्येकी एक, यावलीत दोन रुग्ण सापडले आहेत. उत्तर सोलापुरातील पडसाळीत आठ, सांगोल्यातील वासूद रोडवर, कोळा येथे प्रत्येकी एक, दक्षिण सोलापुरातील हत्तुर, होटगी येथे प्रत्येकी एक, कंदलगावात 15, मंद्रूपमध्ये चार रुग्ण सापडले.
तसेच बार्शीतील अलिपूर रोडवर दोन, मनगिरे मळा, सिध्दार्थ नगर, सुभाष नगर, धोत्रे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. पंढरपुरातील अनिल चौकात दोन, भोसले चौक, गांधी रोड, खवा बाजार, कुंभार गल्ली, महाद्वार, रेल्वे कॉलनी, रोहिदास चौक, सांगोला रोड, विप्रदत्त घाट, करोळे, नेपतगाव येथे प्रत्येकी एक, घोंगडे गल्ली, गोविंदपुरात प्रत्येकी सात, हनुमान मैदान, जुनी पेठेत प्रत्येकी तीन, इसबावीत चार, सणगर गल्लीत चार, संतपेठेत दोन, तानाजी चौकात सात, विजापूर गल्लीत चार रुग्ण आढळले आहेत.
अक्कलकोटमधील बेडर गल्ली, मस्के गल्ली, वेताळ चौक, सुलेरजवळगे येथे प्रत्येकी एक, करमाळ्यातील आळसुंदे, शेलगाव (क) येथे अनुक्रमे एक व दोन रुग्ण सापडले आहेत. माढ्यातील कुर्डूवाडीत तीन, मुंगशीत एक, पडसाळीत दोन, रांझणीत चार, रिधोऱ्यात चार, तांदुळवाडी, उपळाई खु. येथे प्रत्येकी एक, माळशिरसमधील अकलुज व बोरगावमध्ये प्रत्येकी तीन, माळीनगर, श्रीपुर, उघडेवाडी, सिध्दार्थ नगर, विझोरीत प्रत्येकी एक, तर संग्राम नगर व वेळापुरात दोन, यशवंत नगरात सहा रुग्ण आढळले आहेत.
पंढरपुरातील आंबेडकर नगरातील 65 वर्षीय पुरुषाचा तर घोंगडे गल्लीतील 75 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मोहोळमधील अण्णाभाऊ साठे नगरातील 71 वर्षीय पुरुषाचा, बार्शीतील सर्जापूर येथील 45 वर्षीय महिलेचा, तेल गिरणी चौकातील 36 वर्षीय महिलेचा, नाईकवाडी प्लॉटमधील 75 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे. अकलूज येथील दत्त चौक परिसरातील 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज