मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाविरोधी लढ्यासाठी मित्तल ग्रुपने पंतप्रधान निधीसाठी १०० कोटींची मदत दिली आहे. उद्योजक लक्ष्मी एन.मित्तल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की , कोरोनाचा सामना करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
कोरोनाच्या प्रभावाने ग्रासलेल्या कुटुंबांना आणि समुदायांना संरक्षित करण्यासाठी मित्तल ग्रुप १०० कोटी देण्यात येणार आहे. यासोबतच ५००० हुन अधिक जणांना रोजचे जेवण , ३० , ००० जणांना अन्नाची पाकिटे देण्यात येत आहेत . सॅनिटेशन किट्स आणि पीपीई यांचे वाटप करण्यात येत आहे. आमच्या उत्पादन केंद्रांच्या परिसरात अँब्युलन्स सेवांचे एकत्रिकरण करून उपचार केंद्रांची उभारणी करणार आहोत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज