टीम मंगळवेढा टाईम्स।
तू आमच्याकडून चालविण्यासाठी घेतलेल्या ट्रकचे हप्ते का भरले नाहीत? तू आमचा ट्रक आम्हाला परत दे, असे म्हणून
बाळासो बाबासो सलगर (वय ३३, रा. डोंगरगाव) याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून पळवून नेल्याप्रकरणी रावण सिद्धेश्वर चव्हाण (वय ३६) व अज्ञात दोघे (रा.आवंढी, ता. जत, जि. सांगली) या तिघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी, यातील फिर्यादी अश्विनी बाळासो सलगर (वय २३, रा. डोंगरगाव) यांचे पती बाळासो बाबासो सलगर (वय ३३) यांना १६ डिसेंबर रोजी रात्री ११:३० च्या दरम्यान
ओळखीचे आरोपी रावण सिद्धेश्वर चव्हाण व त्यांच्यासोबत आलेल्या अन्य अनोळखी दोन व्यक्तींनी डोंगरगाव येथे येऊन तू आमच्याकडून चालविण्याकरिता घेतलेल्या ट्रकचे हप्ते का भरले नाहीत?
तू आम्हाला आमचा ट्रक परत दे, तू जोपर्यंत ट्रकचे हप्ते भरणार नाही व ट्रक देत नाही तोपर्यंत आम्ही तुला सोडणार नाही, असे म्हणून वरील आरोपींनी
फिर्यादीच्या पतीस जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार विभुते हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज