mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांचा जल्लोष! म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्यात दाखल; आ.आवताडे,आ.परीचारकांनी केले पूजन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 14, 2021
in मनोरंजन, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स। 

बहुचर्चित म्हैसाळ योजनेचे पाणी तब्बल 21 वर्षांनंतर मंगळवेढा वितरिका क्रमांक दोनच्या कालव्याद्वारे आल्याने ऐन उन्हाळ्यात मारोळी, शिरनांदगी, चिक्कलगी, जंगलगी परिसरातील शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे. अक्षय्य तृतीया सणाच्या मुहूर्तावर म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान आ.समाधान आवताडे व आ.प्रशांत परिचारक यांनी दाखल झालेल्या पाण्याचे पूजन केले आहे.

1999 च्या विधानसभा निवडणुकीत या योजनेचा शुभारंभ झाला. सहाव्या टप्प्यातून हे पाणी मंगळवेढा शिवारातील सहा हजार हेक्‍टरसाठी सोडण्याचे प्रस्तावित होते. 1999 पासून ते 2009 पर्यंत राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते.

परंतु या योजनेला 10 वर्षांत अपेक्षित गती मिळाली नाही. मतदारसंघ पुनर्रचेनंतर तत्कालीन आमदार भारत भालके यांनी या पाणी प्रश्नावर पाठपुरावा केला. दरम्यान 2014 मध्ये राज्यात व देशात राजकीय सत्तांतर झाले.

या योजनेचे पाणी तालुक्‍याला मिळावे म्हणून भारत भालके विधानसभेत सातत्याने माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या सोबतीने आवाज उठवत राहिले. त्यामुळे या योजनेसाठी पंतप्रधान सिंचन योजनेतून जवळपास दोन हजारपेक्षा अधिक कोटींची तरतूद करण्यात आल्यामुळे या कामाला गती मिळाली.

स्थानिक आमदार व शासन हे विरोधी असल्याने पाणी देण्याबाबत राजकीय श्रेयवाद झाल्याचा आरोप देखील झाला. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीला पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, अतिरिक्त पाणी वाहून वाया जाण्यापेक्षा हे पाणी दुष्काळी भागाला देण्यासंदर्भात शासनाने प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.

हे पाणी शिरनांदगी तलावात आले. दरम्यान, एका वेळी एका वितरिकेचे काम पूर्ण झाल्यामुळे हे पाणी सध्या कालव्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे महमदाबाद, मारोळी, शिरनांदगी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर खु, सलगर बु, पौट, बावची या गावांतील 3860 हेक्‍टरपर्यंत हे पाणी चाचणीच्या निमित्ताने सोडण्यात आले. त्यामुळे भविष्यकाळात या भागातील शेतीला योजनेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या 21 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तालुक्‍याला अखेर म्हैसाळ योजनेसाठी दिवंगत आमदार भारत भालके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे व शासनाने तरतूद केलेल्या निधीमुळे या योजनेचे पाणी तालुक्‍याला मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी गावांना पाणी मिळावे म्हणून आपण सर्व तालुकासीयांनी पाण्यासाठी मोठा लढा उभा केला होता.

१९९२ -९३ पासून बंद असलेली ही म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूक दळणवळण भूपृष्टमंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेतली होती.

त्यांच्या माध्यमातून व सहकार्यातून पंतप्रधान कृषीसिंचन योजणेत राज्यातील एकूण सात प्रकल्पांचा समावेश करण्यात आला होता. त्या समाविष्ट यादीत आपल्या मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजणेचा समावेश करण्यात आला त्याअनुषंगाने सदरची योजणा कार्यान्वयीत होण्यासाठी मा.पंतप्रधान यांनी अंदाजे ३ हजार कोटी मंजूर केले होते.

ही योजणा केंद्राने दिलेल्या योजणेतून उभा रहात असून आज चाचणी स्तरावर पाणी सोडण्यात आले असून आज ही योजना मंगळवेढा तालुक्यात हरिक्रांती घडवून आणेल. याचेच फलीत म्हणून म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात मारोळी व शिरनांदगीच्या हद्दीवर म्हशाळ योजणा वितरीका नंबर २ येथे दाखल झाले.

या दाखल झालेल्या पाण्याचे पुजन या मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे व विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर श्रीफळ अर्पण करुन झाले.

यामध्ये पडोळकरवाडी , लोणार , महमदाबाद , हुन्नूर , शिरनांदगी , मारोळी , पौट , जंगलगी , सलगर खु.सलगर बु.लवंगी या गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे . हे पाणी अक्षयपणाने तालुक्यास मिळावे तसेच तालुक्याच्या वाट्याचे पाणी अन्य कोठेही जाणार नाही , सदरचे पाणी कोणी अन्यत्र नेण्याचा प्रयत्न झाल्यास मोठा संघर्ष उभा करु असे प्रतिपादन यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी केले.

यावेळी सदरची योजणा मार्गी लावल्याने ग्रामस्थांच्या चेह – यावर समाधान दिसून येत होते.

याप्रसंगी नागरिकांनी दोन्ही आमदार महोदयांचे अभिनंदन केले व उर्वरित गावांचाही पाणी प्रश्न मार्गी लावून मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसून काढावा असे आवाहन उपस्थित जनतेने केले.

यावेळी संबंधीत अधिका – यांकडून आमदार समाधान आवताडे यांनी माहिती घेतली . याप्रसंगी माजी .जि.प.सदस्य शिवानंद पाटील , भाजपा ता.अध्यक्ष गौरीशंकर बुरकूल , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर , दिगंबर यादव , भारत गरंडे , नामदेव जानकर , अंकुश खताळ , पांडूरंग कांबळे , रमेश काशिद , शहाजी गायकवाड , बंडू गडदे , सुनिल पाटील , किसन पाटील , विजय पाटील , यशवंत खताळ , अशोक पाटील , संतोष बिराजदार , आबा खांडेकर , नारायण चौगुले , गौडाप्पा बिराजदार , संतोष कोकरे , दत्ता पाटील , राजू माने , भिमा तांबे , राजू सुतार तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडे

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

घरफोडी! आईच्या उपचारासाठी ठेवलेले पावणेदोन लाख रुपये भावाच्याच मुलाने पळवले

May 27, 2022
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

बनाव झाला उघड! नदीत ढकलून पत्नीचा खून; पतीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा दहा हजार दंड

May 27, 2022
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

May 27, 2022
बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

Breaking! मंगळवेढ्यात लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

May 26, 2022
ठरलं तर मग! ऊर्जामंत्र्यांनी दिले संकेत महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी होणार लोडशेडिंग

दुर्घटना! शेतीपंप सुरू करताना अंगावर विजेची तार पडून मुलाचा मृत्यू; तारेच्या स्पर्शाने विजेचा धक्का बसून वडील जखमी

May 26, 2022
मंगळवेढ्यात बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळयातील ४५ हजाराचे दागिने पळविले

खळबळ! मंगळवेढ्यातील महिलेचे पंढरपूर बसस्थानकात १ लाख ९० हजाराचे दागिने लंपास; चोरी लक्षात आली पण…

May 26, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील ३८७ पोलिसांच्या बदल्या, पहा कुणाची कुठे झाली बदली; संपूर्ण यादी तपासा…

May 26, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

May 25, 2022
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

बालविवाह रोखण्यासाठी SP तेजस्वी सातपुतेंचा पुढाकार, प्रत्येक गाव पोलिस अधिकाऱ्यास दिले दत्तक; मंगळवेढ्यातील ‘या’ गावांचा समावेश

May 25, 2022
Next Post
महाराष्ट्रात कडक निर्बंधांबाबत ‘या’ तारखेनंतर घोषणा होण्याची शक्यता?

Breaking! सोलापूर जिल्ह्यातील 'ही' दुकाने सुरू होणार; पालकमंत्री काय म्हणाले पाहा...

ताज्या बातम्या

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

May 28, 2022
महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

लागा तयारीला! महाराष्ट्रात ७ हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया; गृहमंत्री वळसे पाटलांकडून तारीख ‘जाहीर’

May 28, 2022
मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

घरफोडी! आईच्या उपचारासाठी ठेवलेले पावणेदोन लाख रुपये भावाच्याच मुलाने पळवले

May 27, 2022
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

बनाव झाला उघड! नदीत ढकलून पत्नीचा खून; पतीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा दहा हजार दंड

May 27, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

मंगळवेढा : 17 गावांची पाणी टंचाई होणार दूर, १० कोटींचा निधी मंजूर, आ.आवताडेंची माहिती; ‘या’ गावात कामालाही सुरुवात

May 27, 2022
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

May 27, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा