टीम मंगळवेढा टाईम्स ।
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी मंगळवेढ्यात आजपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार स्वामी यांना देण्यात आले.
यामध्ये मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले असून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे यातून त्यांच्या जीवितास काही धोका झाल्यास संपूर्ण
महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र शासन जबाबदार असेल मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबईमध्ये सगेसोयरे यांचा आरक्षणामध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु विशेष अधिवेशनामध्ये सगेसोयऱ्याचा विषय न घेता मागणी नसणारे आरक्षण देऊ केलेले आहे त्यामुळे मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालातून दिसून आला.
तरी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेला सगेसोयरेचा कायदा लवकर पारित करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच डोंगरगाव मधील बहुसंख्य मराठा बांधव अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी गेलेले आहेत यावेळी मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाचे बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज