टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतीय जनता पक्षाने आज बावीस उमेदवारांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. पहिल्या यादीतून नाव जाहीर न झाल्याने धाकधूक वाढलेल्या आमदारांची आता चिंता मिटली आहे.
बऱ्याच विद्यमान आमदारांची उमेदवारी दुसऱ्या यादीत जाहीर झाली आहे. पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांना भाजपने पुन्हा एकदा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारिक यांच्यामध्ये दिलजमाई
लोकसभेच्या निवडणुकीनंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ चर्चेत आला होता. भाजप नेते प्रशांत परिचारिक आणि समाधान आवताडे यांच्या पंढरपूरच्या आमदारकीवरुन रस्सीखेंच सुरु झाली होती.
प्रशांत परिचारिक राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात होते. शिवाय पंढरपूरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार अशा चर्चाही रंगू लागल्या होत्या. मात्र, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नानंतर समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारिक यांच्यामध्ये दिलजमाई झाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारिक यांच्या संघर्षातील तोगडा काढण्यासाठी आज पंढरपुरात आले होते. त्यांच्या या प्रयत्नांना आज यश आले आहे. त्यामुळे तिरंगी लढत होऊन भाजपला फटका बसेल, या चर्चांना फुलस्टॉप लागला आहे.
समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारिक एकत्र आल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पंढरपुरची लढाई जड जाणार असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीने पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. याशिवाय अभिजीत पाटील याची दोन मतदारसंघात चर्चा सुरु आहे.
अभिजीत पाटील यांच्या उमेदवारीबाबत माढा आणि पंढरपूर दोन्ही मतदारसंघात चर्चा सुरु आहेत. त्यामुळे शरद पवार अखेर कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारिक एकत्र आल्याने भगिरथ भालके आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे टेन्शन वाढले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज