टीम मंगळवेढा टाईम्स ।
उमेदवारांच्या प्रत्येक खर्चावर आता निवडणूक आयोगाबरोबरच जिल्हास्तरीय खर्च समिती लक्ष ठेवणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व बँकांनी बँका बरोबरच मोबाइल अॅप्लिकेशनमधील यूपीआय अन्य ऑनलाइन पेमेंट सिस्टीमद्वारा होणाऱ्या प्रत्येक पेमेंटवर, ट्रांजेक्शनवर लक्ष ठेवावे,
त्यातील संशयास्पद व्यवहारांची माहिती तात्काळ निवडणूक विभागाला द्यावी, असे निर्देश खर्च निरीक्षकांनी बँकांना दिले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व नोडल अधिकारी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवाराच्या खर्चाच्या बाबीवर विशेष लक्ष ठेवणार आहेत. जिल्हास्तरीय खर्च समिती तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात खर्च समितीची स्थापना झालेली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
यासंदर्भात समित्या स्थापन करण्यात आल्या असून अत्यंत बारकाईने निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवून तो खर्च उमेदवारांच्या खर्च नोंदवहीत नोंदवला जाईल याची काळजी घेण्यात येणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समित्यांचे नोडल अधिकारी, जिल्ह्याच्या सर्व ११ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
तसेच राजकीय पक्ष व उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराच्या खर्चाच्या प्रत्येक बाबीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून तो खर्च संबंधित उमेदवारांच्या खर्च नोंदवहीत नोंदवावा असे आवाहन केले आहे.
साड्या… इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्यास थेट गुन्हे
राजकीय पक्ष व उमेदवार यांच्याकडून मतदारांना आमिष म्हणून साड्या व अन्य लहान लहान इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट म्हणून देण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारांना आमिष दाखविल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस यंत्रणा व निवडणूक खर्च यंत्रणा या गोष्टींवर लक्ष ठेवणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज