टीम मंगळवेढा टाइम्स ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा तालुक्याचा निकाल 98.11 टक्के इतका लागला असून इंग्लिश स्कूल मंगळवेढ्यातील वृषाली दत्तात्रय कोरे ही विद्यार्थिनी 100 टक्के गुण मिळवून राज्यात पहिली आली आहे.
तर सृष्टी नागेश पाटील हि 98.40 टक्के गुण मिळवून दुसरी व हर्षवर्धन नागनाथ जोध याला 98 टक्के मिळवून तिसरा आला आहे. या निकालावर इंग्लिश स्कूलचा दबदबा कायम राहिला आहे.
तसेच 27 शाळांचे निकाल 100 टक्के लागले. या परीक्षेसाठी तालुक्यातून 3374 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती त्यापैकी 3334 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले.1587 विद्यार्थी विशेष प्राविण्य घेऊन उत्तीर्ण झाले तर 1136 विद्यार्थी प्रथम श्रेणी तर 463 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले, असे एकूण 3271 उत्तीर्ण झाले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचा टक्का हा सर्वाधिक राहिला. महाराणी ताराबाई गर्ल हायस्कूल या शाळेचा निकाल कमी तर 27 शाळांचे निकाल हे शंभर टक्के लागले.
शाळनिहाय निकाल पुढीलप्रमाणे
इंग्लिश स्कूल मंगळवेढा 97.80, नूतन प्रशाला बोराळे 98. 90, हनुमान विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मरवडे 99.06, जवाहरलाल शेतकी हायस्कूल 96, विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सलगर बुद्रुक 95.12, इंग्लिश स्कूल भोसे 97.50, विद्यामंदिर हायस्कूल लक्ष्मी दहिवडी 96.80 , सिद्धेश्वर विद्यामंदिर माचनूर 99.36, बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर 96.87, माध्यमिक आश्रम शाळा बालाजी नगर 98.79,
माध्यमिक आश्रम शाळा हुन्नूर 97.14 ,कै. दत्ताजीराव भाकरे प्रशाला आंधळगाव 98.86, लक्ष्मीदेवी विद्या मंदिर 97.95,संगम विद्यालय डोंगरगाव 97.70,महाराणी ताराबाई गर्ल हायस्कूल मंगळवेढा 62.50, सिद्धनाथ विद्यालय लेंडवे चिंचाळे 98.18, मात्र लिंग हायस्कूल सिद्धापूर 96 ,
जुनोनी माध्यमिक विद्यालय जुनोनी 96.55, गणेश विद्यालय गणेशवाडी 96.29, शरद पवार विद्यालय शरद नगर 95.27, वेताळ विद्यामंदिर शिरशी 92.85,केंद्रीय निवासी विद्यालय तळसंगी 95.12,नूतन प्रशाला 95.52, जवाहरलाल उर्दू हायस्कूल 83.33, ज्ञानदीप विद्यालय मंगळवेढा 97.77,
100 निकालाच्या शाळा
कै.बाबुराव जाधव प्रशाला धर्मगाव, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मंगळवेढा, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मंगळवेढा, विद्यानिकेतन विद्यालय जालीहाळ, छत्रपती शिवाजी विद्यामंदिर खोमनाळ,
सर्वोदय विद्यालय शिवणगी, रेवणसिद्ध स्वामी विद्यामंदिर तळसंगी, माध्यमिक आश्रम शाळा पडोळकरवाडी, एम.पी. मानसिंगका विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सोड्डी, सद्गुरु बागडे महाराज विद्यालय बावची, कै. लक्ष्मण दादा आकळे विद्यालय हाजापुर,
भैरवनाथ विद्यालय शिरनांदगी, माध्यमिक शाळा अरळी, विलासराव देशमुख प्रशाला कारखाना साईट, स्वामी विवेकानंद विद्यालय गोणेवाडी, कै. श्रीपतराव माने विद्यालय लवंगी, शरदचंद्रजी कृषी विद्यालय मारापुर,माध्यमिक आश्रम शाळा पडोळकरवाडी,शारदा सिद्धनाथ विद्यालय पाटखळ ,
स्वामी विवेकानंद विद्यालय गुंजेगाव , महासिद्ध विद्यामंदिर डोणज,बाळकृष्ण विद्यालय भाळवणी, इंग्लिश स्कूल निंबोणी, संत दामाजी हायस्कूल, मंगळवेढा. कामसिद्ध विद्यालय खुपसंगी, महालिंगराया हायस्कूल हुलजंती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज