टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाचा दारुण पराभव झाला. पोटनिवडणुकी नंतर कारखाना निवडणुकीतही भालके गटावर विठ्ठल रुससेलाच होता.
त्यामुळे भगीरथ भालके यांच्या अंगावर यापुढे गुलाल कधी पडणार याची चिंता त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. त्यांच्या राजकीय भविष्याविषयी चर्चा सुरू झाली होती . ही चर्चा लवकरच थांबली आणि कार्यकर्त्यांची चिताही मिटली आहे.
कारण, दामाजी कारखाना निवडणुकीत समविचारी पॅनलमध्ये भालके गटाला काही जागा मिळाल्या होत्या.
सर्वजण निवडून आल्याने अखेर भालकेंच्या अंगावर गुलाल पडला. गुरुवारी रात्री विजयी उमेदवारांसमवेत भगीरथ भालकेही जल्लोष सहभागी होताना विठ्ठल कारखान्यातील पराभवाची चिंता सोडून दिल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.
त्या जल्लोषामध्ये दोन कार्यकर्ते विठ्ठल जरी आमच्या रुसलेला असला तरी शेवटी दामाजी तरी पावला की, अशी कुजबुज ऐकायला मिळाली.(स्रोत:लोकमत)
दरम्यान, परिचारक समर्थकांनी दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत भालके गटाशी युती करून कारखान्यावर सत्ता काबीज केली आहे.
मात्र, परिचारक व भालके समर्थक हे गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या विरोधात होते ते आता यानिमित्ताने एकत्रित आले आहेत , मात्र या जवळीकतेचा फायदा परिचारकांना कितपत होईल हे येणाऱ्या काळात समजेल.
गेले अनेक वर्ष विरोधात लढलेले आज एकत्रित लढले यामुळे मात्र सच्चा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज